Home /News /national /

डेटिंग App व्दारे आली संपर्कात, मैत्री होताच महिला गेली 5 स्टार हॉटेलमध्ये; पुढे घडला नको तो प्रकार

डेटिंग App व्दारे आली संपर्कात, मैत्री होताच महिला गेली 5 स्टार हॉटेलमध्ये; पुढे घडला नको तो प्रकार

पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने महिलेचा विश्वास घात केला आणि तिच्यावर बलात्कार केला आहे.

    नवी दिल्ली, 10 जून: देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने महिलेचा विश्वास घात केला आणि तिच्यावर बलात्कार केला आहे. दिल्लीतील द्वारका भागातील (Delhi's Dwarka area) एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 3 जूनची आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पीडितेशी डेटिंग अॅप टिंडरवर झाली होती. त्यानंतर त्यांची ओळख वाढली आणि पीडितेला आरोपी मोहक गुप्ता यानंद्वारका येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा हैदराबाद परिसरातील बंजारा हिल्स येथील रहिवासी असून तो सध्या फरार आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. ISI नं रचला होता सिद्धू मुसेवाला हत्येचा कट?, शूटर महाकालनं केला मोठा खुलासा याआधी नोएडामध्ये एका किशोरवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती, जिथे आरोपीला अटक करण्यात आली होती. गौतम बुद्ध नगरच्या फेज-2 पोलीस ठाण्याचे प्रभारी सुजित उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगेल गावात राहणाऱ्या एका तरुणाचे नवीन नावाच्या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी अपहरण केलं होतं. त्याने सांगितलं की, आरोपी तरुणाने किशोरवयीन मुलीवर बलात्कार केला. उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा अहवाल नोंदवून या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी आरोपी नवीनला अटक केली. नवीनला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, असे त्यांनी सांगितले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Dating app, Delhi, Rape, Rape accussed, Rape case

    पुढील बातम्या