जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कमाल! सरकारकडून मिळाली नाही मदत, अखेर 7000 गावकऱ्यांनी असा उभारला 1 कोटींचा पूल

कमाल! सरकारकडून मिळाली नाही मदत, अखेर 7000 गावकऱ्यांनी असा उभारला 1 कोटींचा पूल

कमाल! सरकारकडून मिळाली नाही मदत, अखेर 7000 गावकऱ्यांनी असा उभारला 1 कोटींचा पूल

सरकारकडून मदत मिळाली नाही म्हणून या गावानं स्वत: जमवला 1 कोटींचा निधी, वाचा ग्रामस्थांची Inspirational Story.

  • -MIN READ
  • Last Updated :

आसाम, 11 मे : सध्या कोरोनासारख्या संकटात वाईट बातम्या सतत येत असताना एक चांगली पॉझिटिव्ह बातमी आली आहे. एकीकडे भारतीयांवर कोरोनाचं संकट आलं असताना, एका गावकऱ्यांनी मात्र एकीचं महत्त्व साऱ्या देशाला पटवून दिलं आहे. आसाममधील एका गावानं आपण मनावर घेतलं तर काहीही करू शकतो, हे दाखवून दिलं आहे. येथील गावकऱ्यांना सरकारकडून मदत मिळत नसल्यानं अखेर त्यांनी एकजूटीनं चक्क 1 कोटी रुपये जमा केले. सध्या देशभरात आसाममधील या गावकऱ्यांच्या हिंमतीचे कौतुक केलं जात आहे. गावात पूल नसल्यामुळं लोकांना येण्या-जाण्यासाठी जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत होतो. यासाठी सरकारच्या मदतीची वाट न पाहता, 10 गावांनी मिळून 1 कोटींचा निधी स्वत: जमवला आणि गावात पूल तयार केला. वाचा- बघता-बघता नदीत तयार झाला खड्डा…समोर आलेलं सगळं केलं गिळंकृत, VIDEO VIRAL

News18

इंडिया टाइम्सनं दिलेल्या माहितीत, आसाममधील जलजाली नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल तयार करण्यासाठी 1 कोटींचा खर्च करण्यात आला. 7000 ग्रामस्थांनी मिळून यासाठी निधी जमवला. मुख्य म्हणजे हा पूल शासनाच्या मदतीशिवाय बांधण्यात आला. 2018 पासून या पूलाचे काम सुरू होते, पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामुळं 3 महिने कामबंद ठेवण्यात आले होते. आता अखेर हे काम पूर्ण झाले आहे. वाचा- …आणि अचानक समोर आला हत्ती, पुढे काय घडलं पाहा श्वास रोखून ठेवणारा VIDEO

वाचा- कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 15 महिन्यांच्या चिमुकलीनं डॉक्टरांना दिलं Flying Kiss दरम्यान, याआधी आसाममध्ये असा प्रकार घडला होता. यापूर्वी दिमालाइइ परिसरात गावकऱ्यांनी स्वत: पूर उभारला होता. हा पूल 4 गावांना जोडतो. गावकऱ्यांना सरकारची मदत न मिळाल्यामुळं त्यांनी स्वत: निधी उभारून हा पूल उभारला होता. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात