चंदीगड, 09 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसमुळे निराशेचं वातावरण आहे. 6 महिन्यांच्या चिमुकल्यांपासून ते 92 वर्षांच्या वयोवृद्धपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील रुग्ण देशभरात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे जेव्हा मनात निराशा आणि भीती येते अशा वेळी सोशल मीडियावरील काही व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर आणि मनातली ही भीती दूर करून दिलासा देण्याचं काम सातत्यानं कारत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 15 महिन्यांच्या चिमुकलीनं डॉक्टरांना फ्लाइंग किस्स दिलं. इतकच नाही तर नर्ससोबत हातही मिळवला आहे. या गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
A Very Cute Video Is Going Viral Of A 15 Month Old Baby Girl Giving Flying Kisses To Nursing Staff She Is COVID 19 Positive And Is Admitted To PGI Chandigarh#socialmela #covid19 #coronavirus #chandigarh pic.twitter.com/KMPjZJv7YQ
— Social Mela (@social_mela) May 8, 2020
हे वाचा-शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO
डॉ. नरेंद्र त्यागी यांनी इंडिया टुडेला दिलेला वृत्तानुसार 4 मे रोजी 11.30 वाजताचा हा व्हिडीओ आहे. या चिमुकलीच्या आईचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर या चिमुकलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. या चिमुकलीवर चंदीगड इथल्या PGIMER रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान चिमुकलीनं डॉक्टरांना फ्लाइंग किस्स दिलं आहे.
देशात कोरोना विषाणूचा रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांजवळ पोहोचले आहे. दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
हे वाचा-लॉकडाऊमध्ये ICICI बँकेत निघाला 7 फूट लांब कोब्रा, पाहा थराराक VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.