मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आजोबा रॉक्स बाकी शॉक! नाचता नाचता हवेतच उडू लागले, डान्स फ्लोअरवर लावली आग; पाहा VIDEO

आजोबा रॉक्स बाकी शॉक! नाचता नाचता हवेतच उडू लागले, डान्स फ्लोअरवर लावली आग; पाहा VIDEO

आजोबांना युनिक डान्स करताना पाहून सर्वजण हैराण झाले.

आजोबांना युनिक डान्स करताना पाहून सर्वजण हैराण झाले.

आजोबांना युनिक डान्स करताना पाहून सर्वजण हैराण झाले.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 16 जुलै : डान्स (Dance) करायला प्रत्येकाला आवडतो. काही जणांचा अंगात तर गाणी (Song) ऐकताच संचारू लागतं. जिथं आहेत तिथंच ते थिरकायला सुरुवात करतात. काही जणांचा डान्स (Dance video) तर खूपच विचित्र असतो. जो पाहताच आपल्याला हसू आवरत नाही. असाच विचित्र आणि मजेशीर डान्स (Funny dance video) करणाऱ्या आजोबांचा (Grandfather dance) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात त्यांनी डान्स (Old man dance) करायला सुरुवात करताच पाहून सर्वजण हैराण झाले.

गाणं लागल्यानंतर आजोबा स्वतःला आवरू शकत नाही. सर्व जण डान्स करत असतात तेव्हा त्यांच्या मध्येच जाऊन ते अचानक असा डान्स करतात की इतर नाचणारे सर्वजण बाजूला होतात आणि त्यांनाच पाहत राहतात.

व्हिडीओत पाहू शकता. आजोबा जमिनीवर जोरजोरात उंच उड्या मारत आहेत. मागे सॅड साँग ऐकायला येत आहे आणि याच सॅड साँगवर आजोबा अगदी उत्साहात, मजेत नाचत करत आहेत. आजोबांनी असा ठेका धरला आहे की सॅड साँगसुद्धा मजेशीर वाटत आहे. आजोबांनी डान्सची आपलीच हटके, युनिक स्टाइल शोधून काढली आहे.

हे वाचा - वॉट अ टॅलेंट सरजी! पैसे दुपटीचा कमालीचा फॉर्म्युला; 100 चे 200 रु. कसे केले पाहा

आजोबांचा हा सॉलिड डान्स नेटिझन्सनाही खूप आवडला आहे. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आहे. या वयातही आजोबांचा असा जोश पाहून सर्वांनी त्यांना दाद दिली आहे. या वयात शरीराच्या विशेषतः गुडघेदुखीची तक्रार असतेच असते. पण आजोबांनी असा डान्स केला आहे की गुडघेदुखीसुद्धा त्यांना घाबरून पळून जाईल. काही जणांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

First published:

Tags: Dance video, Funny video, Viral