नवी दिल्ली, 17 मार्च: लहान मुलं आवडत नाहीत, अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. नवजात (New-born Babies) बाळांना पाहण्यात आणि हातांमध्ये घेण्यात अनेकांना स्वर्गीय आनंद मिळतो. बाळांची वाढ होताना त्यांच्यामध्ये होणारे लहान-मोठे बदल पालकांना (Parents) तर वेगळाच आनंद देतात. हसऱ्या-खेळत्या बाळाला पाहिलं की कुणाचाही मूड क्षणात ठीक होऊ शकतो. अशाच एका सहा महिन्यांच्या बाळानं युनिर्व्हसिटीमध्ये (University) लेक्चर (Lecture) देणाऱ्या प्रोफेसरलाही (Professor) भुरळ पाडली. या प्रोफेसरनं आपल्या एका स्टुडंटच्या बाळासोबत ज्याप्रकारे वर्तनं केलं, ते पाहून सर्वांनी त्याचं कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एका युनिर्व्हसिटी प्रोफेसर आणि बाळाचा व्हिडिओ (Professor Baby Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अमेरिकेतील उटाह (Utah) प्रांतामध्ये ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (Brigham Young University) आहे. या ठिकाणी प्रोफेसर असणारे हँक स्मिथ (Hank Smith) सध्या सोशल मीडियावर प्रचंड फेमस झाले आहेत. त्यांनी वर्गामध्ये आपल्या एका स्टुडंटसाठी जे काही केलं त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीमध्ये मॅडी मिलर-शेव्हर (Maddie Miller-Shaver) नावाची विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनी असण्याबरोबरच ती सहा महिन्यांच्या बाळाची आईदेखील (Mother) आहे. जॅक असं तिच्या बाळाचं नाव आहे. सहा महिन्यांच्या बाळाला घरी न ठेवता, मॅडी त्याला एका लेक्चरसाठी युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन गेली. साहजिकच, क्लासमधील गर्दी पाहून लहानगा जॅक काहीसा गोंधळला (Confused) आणि किरकिर करू लागला. त्यामुळे लेक्चरमध्ये अडथळा येऊ लागला आणि मॅडीदेखील अस्वस्थ (Restless) झाली. आता आपल्या लेक्चरमध्ये एखादं लहान मूल किरकिर करत असेल तर साधारणपणे कुठलाही प्रोफेसर त्या बाळाला क्लासच्या बाहेर घेऊन जाण्याचा सल्ला देईल. मात्र, मॅडीच्या प्रोफेसरनं असं केलं नाही. बाळामुळे आपली स्टुडंट असलेल्या मॅडी मिलर-शेव्हरला लेक्चर अटेंड करण्यात अडचण येत असल्याचं लक्षात घेऊन प्रोफेसर हँक स्मिथ यांनी तिच्या बाळाला आपल्या कडेवर घेतलं. बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी आपलं लेक्चर सुरू ठेवलं. हे दृश्य पाहून क्लासमधील प्रत्येक स्टुडंटनं आपल्या प्रोफेसरचं कौतुक केलं. क्लासमध्ये आपलं बाळ लेक्चर देणाऱ्या प्रोफेसरच्या कडेवर खेळत असताना मॅडीनं एक व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला. प्रोफेसरला मुलासोबत पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
मॅडीनं या वर्षी (2022) जानेवारी महिन्यात या लेक्चरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला होता. ‘जॅक @hankrsmith यांचा नवीन T.A झाला आहे’. आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणारे प्रोफेसर असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकते याचा मला आनंद आहे. मी त्यांची आभारी आहे,’ असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलं होतं. आतापर्यंत सात मिलियनहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. या व्हिडिओमध्ये, प्रोफेसर हँक स्मिथ लेक्चर देत असताना मॅडीच्या बाळाला घेऊन फिरताना दिसत आहेत. या कृतीबद्दल नेटिझन्सनी प्रोफेसर स्मिथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘ओह गॉड! हे खूपच क्यूट आहे,’ अशी कमेंट एका युजरनं केली आहे. जगभरात अनेक विद्यार्थिनी लग्न आणि मुलं झाल्यानंतरही शिक्षण घेतात. मात्र, बाळाच्या जबाबदारीमुळे त्यांना सर्वच लेक्चर अडेंट करता येत नाहीत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थिनींना थोडीफार मदत केली पाहिजे असा आदर्श प्रोफेसर हँक स्मिथ यांनी घालून दिल्याचं म्हटलं जात आहे.