Home /News /maharashtra /

Corona Third Wave ची भविष्यवाणी खरी ठरणार की काय? 'या' जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

Corona Third Wave ची भविष्यवाणी खरी ठरणार की काय? 'या' जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात पण आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत.

    मुंबई, 26 ऑगस्ट : कोरोनाच्या (Coronavrirus in Maharashtra) तिसऱ्या लाटेत (Corona third wave) राज्यात दररोज 60 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळतील, असा अंदाज राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता ही भविष्यववाणी खरी ठरणार की काय अशीच भीती आता वाटू लागली आहे. राज्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात (Maharashtra)  कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे पण तिसरी लाट महाभयंकर (Coronavirus Third Wave)  असणार आहे, असं आरोग्य विभागानेच सांगितलं आहे. राज्यात दररोज 60 लाख प्रकरणं समोर येऊ शकतात. याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. कारण कोरोना रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. साताऱ्यात तर कोरोनाचा उद्रेकच झाला आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार साताऱ्यात आज दिवसभरात तब्बल 821 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा सहाशेच्या खाली होता. मृत्यूचं प्रमाणही इथं सर्वात जास्त आहे. दिवसभऱात 32 मृत्यूची नोंद झाली आहे. हे वाचा - तिसऱ्या लाटेआधी पालकांसाठी धोक्याची घंटा! 25 दिवसांत राज्यात 4500 मुलांना कोरोना आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणेच कोरोनाची तिसरी लाट जेव्हा पीकवर असेल म्हणजे सर्वोच्च शिखर गाठेल तेव्हा मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रकरणं असतील. आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अलर्ट केलं आहे आणि व्यापक स्तरावर तायारी करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये मुंबईत 11 मार्चला 91,100 तर पुण्यात 19 मार्चला 1.25 लाख प्रकरणांची नोंद झाली होती.  तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये इथं अनुक्रमे 1.36 लाख, 1.87 लाख  प्रकरणं सापडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. हे वाचा - कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; जगात या 3 देशांत अजून Vaccination सुरूच नाही झालं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, तिसऱ्या टप्यात 60 लाख लोकांना करोनाची बाधा होईल असा अंदाज आहे. त्यासाठी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. 13 लाख लोकांना ऑक्सिजन लागेल. बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दोन हजार टन पर्यंत वाढवली आहे. राज्याने औषधसाठी वेगळी आर्थिक तरतूद केली आहे . आपण तिसऱ्या लाटेची तयारी पूर्ण करतो आहोत.
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या