मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नुसता राडा! तरुणीने फोडल्या दुकानातील लाखो रुपयांच्या दारुच्या बाटल्या, पाहा VIDEO

नुसता राडा! तरुणीने फोडल्या दुकानातील लाखो रुपयांच्या दारुच्या बाटल्या, पाहा VIDEO

महिला सुपरस्टोअरमध्ये घुसली आणि लाखो रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या तिने सरळ फोडून टाकल्या.

महिला सुपरस्टोअरमध्ये घुसली आणि लाखो रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या तिने सरळ फोडून टाकल्या.

महिला सुपरस्टोअरमध्ये घुसली आणि लाखो रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या तिने सरळ फोडून टाकल्या.

  • Published by:  desk news

लंडन, 18 जानेवारी: सुपर मार्केटच्या (Supermarket) एका विभागात ठेवण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या (Worth Lakhs) मद्याच्या बाटल्यांचा (Liquor Bottles) एका महिलेनं (Woman) अक्षरशः चुराडा (Broken) केल्याची घटना समोर आली आहे. जर्मनीतील प्रसिद्ध चेन असणाऱ्या अल्दी (Aldi) कंपनीच्या युकेतील स्टोअरमध्ये ही महिला शिरली आणि कुणाला काही समजायच्या आतच तिने दारूच्या बाटल्यांचा विध्वंस करायला सुरुवात केली. काही क्षणांतच तिने तब्बल 10000 युरो किंमतीच्या बाटल्या फोडून टाकल्या. 

मनोरुग्ण महिला

ही घटना घडली युकेतील हर्ट्झ भागात. अल्वारेझ नावाची 36 वर्षांची महिला या दुकानात घुसली आणि तिने एकाएकी महागड्या मद्याच्या बाटल्या फोडायला सुरुवात केली. डाव्या हाताने ती बाटल्या ढकलू लागली आणि रॅकमधून खाली पाडू लागली. उजव्या हातात एकेक बाटली घेऊन जमिनीवरही आपटू लागली. यामुळे जमिनीवर दारूच्या बाटल्या आणि फुटलेल्या काचांचा अक्षरशः खच पडला होता. त्यातच ही महिला पाय घसरून पडली आणि तिच्या हाताला गंभीर जखम झाली. मात्र तरीही तिने दारुच्या बाटल्या फोडणं सुरूच ठेवलं. 

" isDesktop="true" id="658453" >

सुरक्षारक्षकाने घेतलं ताब्यात

यावेळी सुरक्षारक्षकाने महिलेला पकडलं आणि तिला उपचारांसाठी अगोदर हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळी तिला मदत करणाऱ्या सुरक्षारक्षकालाही तिने सुुनावलं. तुम्ही भारतीय लोक आमच्या टॅक्सच्या पैशांवर इथे राहता, असं काहीबाही बरळत तिने आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. 

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ही घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांनी त्याचं सीसीटीव्ही फुटेज स्टोअरच्या मालकानं सार्वजनिक केलं आणि ते यूट्यूबवर टाकलं. हे फुटेज सध्या जोरदार व्हायरल होत असून त्यात या महिलेनं कशा प्रकारे महागड्या मद्याचा विध्वंस केला, हे दिसून येत आहे. 

हे वाचा -

कोर्टाने ठोठावला दंड

कोर्टाने या प्रकरणात अलावरेझला साडेचार लाख रुपयांचा म्हणजेच 5 हजार युरोचा दंड ठोठावला असून सुपरमार्केटच्या मालकाला ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. महिलेनं आपली मानसिक अवस्था बरी नसल्याचं न्यायालयाला सांगितलं आहे. कामाच्या ठिकाणी, नात्यांच्या बाबतीत आणि वैयक्तिक आयुष्यातही सतत निराशा असल्यामुळे आपल्याला वेडाचे झटके येत असल्याची माहिती तिने दिली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

First published:

Tags: Liquor stock, Uk, Viral video., Woman