गुवाहाटी, 26 जुलै : इतर वन्य प्राण्यांच्या (Animal video) तुलनेत हत्ती (Elephant) हा तसा शांत प्राणी. पण जर तो चवताळला (Elephant video) तर मात्र काही खरं नाही. अनेकदा हत्ती काही करणार नाही म्हणून किती तरी लोक हत्तीच्या अगदी जवळ जातात. पण हत्तींशी (Angry Elephant) पंगा घेणं किती महागात पडू शकतं, याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जमावाने हत्तींच्या कळपाशी पंगा घेतला आणि त्याचा भयंकर परिणामही दिसून आला (Assam Elephant Video) . हत्तींचा कळप रस्ता ओलांडून जात असताना एका जमावाने हत्तींसोबत मजामस्ती करण्याचा प्रयत्न केला. या जमावात सर्वात जास्त लहान मुलं आणि तरुणच दिसून येत आहेत. एखादा खेळ असावा असं त्यांनी हत्तीशी खेळण्याचा प्रयत्न केला पण पुढे जे घडलं ते भयंकर होतं.
#हाथियों से पंगा😢😢😢
— Rupin Sharma IPS (@rupin1992) July 26, 2021
Yesterday evening in #Golaghat #Assam.
One trampled in #NH37 near #Marangi_TE.
Kyonki HAATHI se panga liya....@ParveenKaswan@susantananda3 @SudhaRamenIFS @GolaghatPolice pic.twitter.com/TQmxqmEjM9
व्हिडीओत पाहू शकता, हत्तींचा कळप रस्ता ओलांडत आहे. रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात आहे. त्याचवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांचा जमाव दिसत आहे. व्हिडीओत एक छोटा मुलगा तर हत्तींच्या अगदी जवळ जाताना दिसतो. त्याच्या हातात एक कापडही आहे. या कापडाने तो हत्तींशी मस्करी करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला सर्व हत्ती शांतपणे भरभर पळत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जातात. पण शेवटचा हत्ती मात्र संतप्त होतो. हे वाचा - OMG! फिरत्या पंख्यात महिलेने आपली जीभ टाकली आणि…; VIDEO पाहून अंगावर येईल काटा लोकांना असं करताना पाहून हत्ती इतका चवताळतो की तो लोकांच्या दिशेने धावत सुटतो. लोक जीव मुठीत धरून पळू लागतात. तेव्हाच एक मुलगा तिथं जमिनीवर घसरून पडतो. हत्ती त्याच्या जवळ जातो आणि त्याला पायाने उडवतो. त्यानंतर हत्ती तिथून माघारी परततो आणि आपल्या मार्गाने निघून जातो. त्यानंतर मात्र त्या मुलाचीही काही हालचाल होताना दिसत नाही. हे वाचा - Video: 10 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी लहान कुत्र्यानं लावली जीवाची बाजी आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार आसामाच्या गोलाघाटमधील हे धक्कादायक दृश्य आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण शॉक झाला आहे.