• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • 10 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी लहान कुत्रा आला पुढे, लढला हिंस्त्र प्राण्यासोबत; Video Viral

10 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी लहान कुत्रा आला पुढे, लढला हिंस्त्र प्राण्यासोबत; Video Viral

Viral Video: एका दहा वर्षांच्या मुलीवर हल्ला करणाऱ्या कोयोटी या प्राण्याला हाकलून (Coyote attacks 10 year old girl) लावताना एक छोटा कुत्रा गंभीररित्या जखमी (Dog injured in fight with coyote) झाला.

  • Share this:
कॅनडा, 26 जुलै:  शेकडो वर्षांपासून कुत्रा हा प्राणी माणसाच्या सोबत राहत आला आहे. एक विश्वासू साथीदार आणि माणसाचा खरा मित्र म्हणून श्वानाकडे (Man’s Best friend) पाहिलं जातं. घराचे रक्षण करण्यासाठी, चोरांना पकडण्यासाठी, सोबत खेळण्यासाठी आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये हे श्वान आपली साथ देतात. कुत्रा हा माणसाचा ‘बेस्ट फ्रेंड’ का समजला जातो, याचा आपल्याला वेळोवेळी विविध घटनांमधून प्रत्यय येत राहतो. अशीच एक घटना कॅनडामध्ये घडली आहे. एका दहा वर्षांच्या मुलीवर हल्ला करणाऱ्या कोयोटी या प्राण्याला हाकलून (Coyote attacks 10 year old girl) लावताना एक छोटा कुत्रा गंभीररित्या जखमी (Dog injured in fight with coyote) झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली, आणि याचा व्हिडिओ (Dog Coyote fight video) आता सोशल मीडियावर व्हायरल (Dog coyote viral video) होतो आहे. TV9 हिंदीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. टोरोंटोच्या स्कारबॅरो भागात राहणारी लिली क्वान नावाची एक मुलगी आपल्या मॅसी नावाच्या कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. याचवेळी लांडग्याच्या प्रजातीतील कोयोटी नावाच्या एका हिंस्त्र प्राण्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेली लिली तेथून पळून जाऊ लागली. हा कोयोटी तिच्यामागे धावणार एवढ्यात मॅसीमध्ये आडवा आला, आणि या कोयोटीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू लागला. जोपर्यंत लिली सुरक्षित ठिकाणी पोहोचली नाही, तोपर्यंत मॅसी या कोयोटीशी लढत (Dog fights coyote) राहिला. कोयोटी खरं तर मॅसीला टाळून लिलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मॅसीमागे हटण्यास तयार नव्हता. या लढाईमध्ये मॅसी गंभीररित्या जखमी (Dog injured) झाला. रक्तबंबाळ झाल्यानंतरही मॅसीने कोयोटीशी लढाई सुरूच ठेवली. या लढाईमध्ये मॅसीला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत बोलताना लिलीची आई डोरोथी यांनी सांगितले, की ही घटना घडली तेव्हा त्या कामावर गेल्या होत्या. मात्र, मुलीवर कोयोटीने हल्ला केल्याची माहिती मिळताच आपण तातडीने घरी परत आलो होतो, अशी माहिती त्यांनी दिली. 8 वर्षांआधी मृत्यू झालेल्या गर्लफ्रेंडसोबत आजही बोलतो हा व्यक्ती; कसं झालं शक्य? या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटिझन्स मोठ्या प्रमाणात मॅसीचं कौतुक करत आहेत. कोयोटीपेक्षा लहान शरीरयष्टीने असूनही मॅसीने दिलेला लढा पाहून लोक त्याला हिरो म्हणू लागले आहेत. यासोबतच, मॅसीवर उपचार सुरू असल्यामुळे जगभरातील कित्येक लोक सध्या मॅसी लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
Published by:Pooja Vichare
First published: