मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! फिरत्या पंख्यात महिलेने आपली जीभ टाकली आणि...; VIDEO पाहूनच अंगावर येईल काटा

OMG! फिरत्या पंख्यात महिलेने आपली जीभ टाकली आणि...; VIDEO पाहूनच अंगावर येईल काटा

जिभेने फिरता पंखा थांबवून (Woman stopped fan with tongue) या महिलेने वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) केला आहे.

जिभेने फिरता पंखा थांबवून (Woman stopped fan with tongue) या महिलेने वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) केला आहे.

जिभेने फिरता पंखा थांबवून (Woman stopped fan with tongue) या महिलेने वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) केला आहे.

मुंबई, 26 जुलै : फिरता पंखा (Fan) हाताने थांबवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. काही जणांकडे हे खतरनाक टॅलेंट असतं. पण एक महिला हातानेच नाही तर आपल्या जिभेने (Woman stopped fan with tongue)  पंखा थांबवते. या महिलेचं हे अति खतरनाक टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जिभेने आपण अनेकांनी नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असेल पण कधी जिभेने पंखा थांबवण्याचा विचारही केला नसेल. पण एका महिलेनं आपलं हे करतब दाखवून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

ही महिला ऑस्ट्रेलियातील आहे. जो एलिस (Zoe Ellis) असं तिचं नाव आहे. जो आपल्या हातांचा बिलकुल वापर करत नाही. फक्त जिभेनेच फिरता पंखा थांबवते.

हे वाचा - Video: 10 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी लहान कुत्र्यानं लावली जीवाची बाजी

व्हिडीओत पाहू शकता ही महिला कशा पद्धतीने पंख्याच्या फिरत्या ब्लेडवर आपली जीभ लावते आणि पंख्याचं फिरणं थांबवते. तिला असं करताना पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.  ती हे थरारक टॅलेंट दाखवत असताना तिथं उपस्थित लोकही शॉक होतात. साहजिकच यामुळे तिची जीभ कापली जाण्याचीही शक्यता आहे. कदाचित तिचा अंदाज किंचितसा जरी तुकला तरी तिच्या जिभेचे दोन तुकडे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हे वाचा - Watch Video: या जिगरबाजीला सलाम, महाभयंकर पूरस्थितीत अशी बजावली कामगिरी

तिच्या या अनोख्या टॅलेंटची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनेही (Guinness World Records) नोंद घेतली आहे. तिने जिभेने पंखा रोखून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार जोने इटलीमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, World record