नवी दिल्ली 12 मार्च : माणसांची शर्यत किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा पाहणं प्रत्येकाला आवडतं. पण प्राण्यांची शर्यत पाहणं अधिक मनोरंजक असतं. घोड्यांपासून कुत्र्यांपर्यंतची शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. असाच जमाव नुकताच एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला, ज्यामध्ये लोकांनी घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र ही रेस सुरू असतानाच एका महिलेला काय झालं माहिती नाही अन् ती अचानक घोड्यांच्या रस्त्यात येऊन उभा राहिली. प्री-वेडिंग फोटोशूटसाठी तरुण तरुणीचा धोकादायक स्टंट, Video पाहून अंगावर येईल काटा @uncensoredpromo या ट्विटर अकाउंटवर अनेकदा विचित्र व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक महिला घोड्यांच्या शर्यतीत अचानक समोर येते. घोडेस्वारी हे अतिशय कठीण काम आहे. कोणीही घोड्यावर स्वार होऊ शकतो, परंतु नंतर त्यावर नियंत्रण ठेवणं सोपं नाही. एकदा घोडे धावू लागले की त्यांना थांबवणं कठीण असतं. अशा स्थितीत थेट घोड्यांसमोर येणं नक्कीच मूर्खपणाचं आहे. मात्र हीच चूक या महिलेनं केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही महिला एका ट्रॅकजवळ उभी असल्याचं दिसत आहे. तिथे अनेक प्रेक्षक उपस्थित होते. अचानक एक घोडा भरधाव वेगाने निघून जातो आणि त्याच्या शेजारी उभे असलेले लोक त्याला सपोर्ट करतात. पण दुसरा घोडा तिथून निघताच शेजारी उभी असलेली एक महिला वाटेत समोर येते आणि घोडा आपला वेग थांबवू शकत नाही. घोडा तिला धडक देत तुडवून निघून जातो. महिलेला पाहून जाणवतं की तिला भरपूर मार लागला आहे, कारण बराच वेळ ती जमिनीवरुन उठतही नाही.
या व्हिडिओला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, असं दिसतं की मागे उभ्या असलेल्या महिलेने महिलेला समोर ढकललं, ज्यामुळे ती खाली पडली. एकाने म्हटलं, की घोडेस्वाराच्या पायाला महिलेचा स्पर्श झाला, घोड्याने तिला पाडलं नाही. आणखी एकाने म्हटलं की, दुसऱ्या महिलेनं तिला धक्का दिल्याने तिचा तोल गेला.