मुंबई १५ नोव्हेंबर : सोशल मीडिया चे जग हे इतकं मोठं आहे की इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. अगदी येथे आपल्याल्या महत्वाची माहिती देखील मिळते, तसेच इथे आपल्याला मनोरंजक व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. सध्ये एक असाच व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहाताना थोडा मनोरंजक आहे, पण तो तितकाच धक्कादायक देखील आहे. हा एका गायीचा व्हिडीओ आहे. यामध्ये ही गाय असं काही करताना दिसते, ज्यावरती विश्वास ठेवणं देखील कठीण आहे. कारण गायीचं असं रुप क्वचितच कोणी तरी पाहिलं असेल. गायीचा स्वभाव मुळात शांत आहे. त्यामुळे ती फारसा कोणाला त्रास देत नाही. पण ती एकदा का रागावली की ती काय करु शकते, याचं चांगलंच उदाहरण आपल्याला तिने दिलं आहे. हे ही पाहा : Viral Video : आधी गाईला लाथ मारली मग शेपूट खेचली… त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं या व्हिडीओमध्ये गाय एका व्यक्तीसोबत फुटबॉल सारखं खेळत आहे, तसेच ती त्याला गोलगेल फिरवून लाथेनं देखील मारते. हा व्हिडीओ पाहाताना फारच मनोरंजक आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच हसाल, पण ज्या व्यक्तीसोबत असं घडलं आहे, त्या व्यक्तीला यामुळे किती त्रास झाला, हे त्याचं त्यालाच माहित. कोणालाही त्रास देऊ नये, त्याचं फळ आपल्याला याच जन्मात मिळतं असं म्हणतात. तेच खरंतर या व्यक्तीसोबत घडलं, फक्त फरक एवढाच आहे की त्याला याची शिक्षा काही सेकंदात मिळाली.
हा व्यक्ती गायीला जबरदस्ती अंघोळ घालण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याची शिक्षा गायीने त्याला दिली आणि फुटबॉल सारखं उडवलं. गाय ज्या पद्धतीने त्या व्यक्तीवर हल्ला करत होती ती अतिशय धोकादायक आहे. हा व्हिडीओ _i_t_s_habibi_ नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला लोकांनी पसंती दर्शवली आहे. लोकांनी या व्हिडीओला भरभरुन लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.