जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video viral : गायीला शिकार बनवण्याच्या प्रयत्नात होती मगर, शेपूट धरुन खेचलं पण अचानक...

Video viral : गायीला शिकार बनवण्याच्या प्रयत्नात होती मगर, शेपूट धरुन खेचलं पण अचानक...

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आपला शिकार कसा पकडायचा आणि त्याला आपल्या जाळ्यात कसं आडकवायचं? हे जंगलातील प्राण्यांना चांगलंच माहित असतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 2 नोव्हेंबर : जंगलाचा हा नियम आहे की शक्तीशाली प्राणी किंवा मोठे प्राणी हे लहान किंवा शाकाहारी प्राण्यांना आपला शिकार बनवतात. ही एक अन्न साखळी आहे आणि जंगलातील जीवन हे असंच आहे. यासगळ्यात ताकदवार असतात ते सिंह किंवा वाघ. पण यासोबत पाण्यात राहाणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर देखील खूपच शक्तिशाली आणि चतुर असते. आपला शिकार कसा पकडायचा आणि त्याला आपल्या जाळ्यात कसं आडकवायचं हे तिला चांगलं ठावूक असतं. त्यामुळे अशा प्राण्यांच्या तावडत एकदा अडकलं की त्यापासून सुटका होणे जवळ-जवळ अशक्यच आहे. हे ही पाहा : Viral Video : आधी गाईला लाथ मारली मग शेपूट खेचली… त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं मगर तर आपले मोठे दात आणि मजबुत जबड्याचा वापर करुन आपल्या शिकाऱ्याचा लचकाच तोडते. पण असे असले तरी देखील मगरीच्या तावडीत जेव्हा गाय अडकते तेव्हा तिच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे.

    जाहिरात

    नुकताच वाईल्ड लाईफ संबंधीत एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे, जो धक्कादायक आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता, ज्यामध्ये एक भुकेली मगर गायीला आपला शिकार बनवण्याच्या तयारीत आहे, पण यादरम्यान असे काही घडते, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. हे ही पाहा : खेकड्याने स्वत: उपटून काढला आपला दुसरा हात, विचित्र वागण्याचा व्हिडीओ व्हायरल खरंतर जेव्हा मगर गायीवर हल्ला करते आणि तिची मागची बाजू पकडून ठेवते, तेव्हा जराही हिंमत न गमावता गाय तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते. अखेर तिचे हे प्रयत्न सफल ठरतात आणि ती मगरीच्या तावडीतून पळ काढते. व्हिडीओच्या शेवटी, मगर थकलेली दिसत आहे. हा व्हिडीओ twfeq नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लोकांना फार आवडला आहे. लोकांनी या व्हिडीओला शेअर आणि लाईक देखील केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात