व्हिडीओत पाहू शकता एक लहान मुलगा घरातून धावच निघाला. गेटबाहेर पडला आणि आधी तिथं उभा राहिला. त्यावेळी त्याच्यासमोरून एक कचऱ्याची गाडी जाताना दिसते. ही गाडी थोडी पुढे गेली की मुलगा रस्ता क्रॉस करायला जातो. पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक भरधाव गाडी येत असते. मुलाचं लक्ष तिथं नव्हते. पण कचऱ्याच्या गाडीशेजारी खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या सफाई कर्मचाऱ्याचं लक्ष तिथं जातं. हे वाचा - चक्क कुत्र्यानं वाचवला माशाचा जीव; हा VIRAL VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं सफाई कर्मचारी धावत येत त्या मुलाला मागे खेचतो आणि समोरून एक भरधाव कार जाते. सफाई कर्मचारी वेळेवर धावला म्हणून नाहीतर भयंकर दुर्घटना झाली असतील. भरधाव कार या मुलाला उडवून निघून गेली असती. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. नेटिझन्सनी या सुपरहिरो सफाई कर्मचाऱ्याचं कौतुक केलं आहे.If you’ve already seen a sanitation worker save a little boy’s life today just keep on scrolling… pic.twitter.com/lVG44aSnco
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) September 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Shocking viral video, Viral, Viral videos