Home /News /viral /

पाणी वापरता की वॉटर पार्क चालवता? 26 लाखांचे बिल पाहून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न

पाणी वापरता की वॉटर पार्क चालवता? 26 लाखांचे बिल पाहून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न

या व्यक्तीने त्याच्या पाण्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलाय. त्या बिलातील आकडेवारी पाहून लोक चकित झाले आहेत. कारण, त्याला तब्बल 26 लाखांचं पाणी बिल आलंय.

     मुंबई, 16 जून : पाणी ही सध्याच्या काळातील सर्वात अमुल्य गोष्ट आहे. फक्त महराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्य आणि जगभरात दुष्काळ ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खाली जात असून अनेक भागात पाणी टचांई निर्माण होते. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहान सरकारी पातळीवर तसंच वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून वारंवार केले जाते. पाणी टंचाई निर्माण झाल्यास अनेक ठिकाणी शासनाकडून पाणीपुरवठा केला जातो आणि त्या बदल्यात लोक विजेप्रमाणे पाण्याचं बिल (Water Bill) भरतात. पण एखादी व्यक्ती एका दिवसात किती पाणी वापरत असेल, याचा तुम्ही विचार केला आहे का? आता तुम्ही म्हणाल आम्ही असा प्रश्न का विचारतोय? तर, त्या मागचं कारण पाण्याच्या बिलाचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक फोटो आहे. मलेशियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या पाण्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलाय. त्या बिलातील आकडेवारी पाहून लोक चकित झाले आहेत. कारण, त्याला तब्बल 26 लाखांचं पाणी बिल आलंय. त्या व्यक्तीने त्या बिलाचा फोटो फेसबुकवर शेअर केला होता आणि आता तो व्हायरल झालाय. या व्यक्तीने हे बिल "We Are All People From Raub" नावाच्या पेजवर शेअर केलं आहे. तसंच ‘मी बँकरप्सीसाठी अर्ज करू शकतो का?’ अशी कॅप्शन त्याने फोटो शेअर करताना दिली आहे. हे बिल व्हायरल झाल्यानंतर ही त्या पाणी वितरण विभागाची चूक असू शकते, असं म्हटलं जातंय. एक व्यक्ती एवढ्या किमतीचं पाणी वापरूच कशी शकते?, असा प्रश्न अनेकांना पडलाय. या व्यक्तीने सुमारे 99,740m3 पाणी वापरल्याचं बिलात लिहिलंय. म्हणजेच दीड लिटर कोल्ड्रिंकच्या बाटलीत एवढे पाणी भरले तर त्यात तब्बल 6 कोटी 64 लाख 93 हजार 333 बाटल्या भरल्या जातील. घरात Cockroaches पाळण्यासाठी कंपनी देतेय दीड लाख रुपये; तुम्हाला मान्य आहे का ही विचित्र ऑफर? एका व्यक्तीला आलेलं इतक्या रुपयांचं पाणी बिल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या बिलावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हा माणूस काय काम करतो की त्याने इतकं पाणी वापरलं,’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसरा एक जण म्हणाला, ‘कदाचित याच्यामुळेच माझ्या घरात पाणी येत नाहीये.’ त्याचबरोबर अनेकांनी गंमतीत त्यांच्या घरी पाणी नसण्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं आहे. तर ‘ही व्यक्ती नक्कीच वॉटर पार्क चालवत असणार, कारण त्याशिवाय इतकं बिल येऊच शकत नाही.’ अशी प्रतिक्रिया आणखी एकानं दिली आहे.
    First published:

    Tags: Photo viral, Social media, Water

    पुढील बातम्या