जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'या' गावात लावलं जातं गाढवांचं आणि बेडकांचं लग्न! कारणही आहे खास

'या' गावात लावलं जातं गाढवांचं आणि बेडकांचं लग्न! कारणही आहे खास

हा अनोखा सोहळा साजरा करण्यासाठी गावकरी एकत्र येतात.

हा अनोखा सोहळा साजरा करण्यासाठी गावकरी एकत्र येतात.

इतरांना येथील प्रथा-परंपरा विचित्र वाटत असल्या तरी, स्थानिकांसाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. या प्रथा-परंपरा एकमेकांबद्दल आपलेपणाची भावना वाढवतात.

  • -MIN READ Local18 Andhra Pradesh
  • Last Updated :

अनंतपुरम, 21 जुलै : आंध्र प्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यात वसलेल्या शेत्तूर मंडल या गावात एक विलक्षण प्रथा आहे. ही प्रथा गावकऱ्यांचा निसर्गाशी असलेला घनिष्ट संबंध आणि दुष्काळापासून मुक्ती मिळवण्याचा त्यांचा अनोखा दृष्टिकोन दर्शवते. या गावात पाऊस न पडल्याने स्थानिकांना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतोय. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी एक विलक्षण विधी केला. त्यांनी दोन गाढवांचं लग्न लावून दिलं. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, या लग्नामुळे वरूणदेवता संतुष्ट होईल आणि पाऊस पडेल. प्रतिकूल परिस्थितीत गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धती सोडून निसर्गाशी नातं जोडण्याचा निर्णय घेतला. ते आपापल्या घरातून धान्य घेतात आणि जंगलात जातात. तिथे शांत वातावरणात जेवण बनवलं जातं. त्यानंतर मनापासून प्रार्थना करून पाऊस पाडण्याची विनंती देवाकडे करतात. निसर्गाप्रती असलेली त्यांची नितांत श्रद्धा, एकता आणि भक्तीच्या सामर्थ्यावर असलेला त्यांचा विश्वास या प्राचीन प्रथेतून दिसतो.

News18लोकमत
News18लोकमत

दुष्काळात बेडकांचं लग्न लावणं ही या गावातील आणखी एक आकर्षक परंपरा आहे. निसर्गाच्या गूढपणावर विश्वास असणारे गावकरी या उभयचरांना वरूण देवाचे प्रतीकात्मक संदेशवाहक मानतात. हा अनोखा मिलाप साजरा करण्यासाठी गावकरी एकत्र येतात. त्यांना खात्री असते की, त्यांच्या श्रद्धेवर देवाची कृपा होईल आणि गावात पुरेसा पाऊस पडले. कित्येक पिढ्यांचा जाणतेपणा आणि वारसा असलेल्या समाजाच्या सांस्कृतिक विणेला या गावातील चालीरीती आणि विधी आकार देत आहेत. गावातील प्रत्येकजण त्यांच्या पूर्वजांच्या श्रद्धा आणि मूल्यांचा आदर करत आहे. इतरांना येथील प्रथा-परंपरा विचित्र वाटत असल्या तरी, स्थानिकांसाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. या प्रथा-परंपरा त्यांना त्यांच्या मुळांशी जोडतात आणि एकमेकांबद्दल आपलेपणाची भावना वाढवतात. PHOTOS : प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची बचत, अन्…., सीमा हैदरने असे जमवले 12 लाख रुपये या गावातील रमणीय भूप्रदेशात एकजूट, विश्वास आणि निसर्गाबद्दल आदराची भावना फुलते. प्राचीन रीतिरिवाज साजरे करताना गावकऱ्यांच्या समुदायाची ओळख जपली जाते आणि त्यांच्या पूर्वजांचा मानही राखला जातो. भारतातील अनेक खेड्यापाड्यांमधील निसर्गपूजक जाती-जमातींमध्ये अशा प्रथा अस्तित्त्वात आहेत. निसर्गाची कृपा होण्यासाठी ते या प्रथा पाळतात. मात्र, काही ठिकाणच्या निसर्गपूजक जमातींवर सध्या निसर्ग कोपला असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील विशेषत: अनेक दुर्गम भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरडी कोसळून अनेकांचे जीव गेले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात