advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / PHOTOS : प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची बचत, अन्...., सीमा हैदरने असे जमवले 12 लाख रुपये

PHOTOS : प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची बचत, अन्...., सीमा हैदरने असे जमवले 12 लाख रुपये

पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा हैदरच्या चौकशीमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. उत्तरप्रदेश एटीएसकडून तिची चौकशी सुरू आहे. आता याप्रकरणी आणखी एक बाब समोर आली आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानातील आपले घर विकून 12 लाख रुपये घेऊन भारतात आली आहे. मात्र, हे पैसे तिच्याकडे कुठून आले आणि या पैशांचा स्त्रोत काय आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

01
सीमा हैदर पाकिस्तानमध्ये आपले घर विकून आपला प्रियकर सचिनला भेटायला नोएडा आली होती. 4 जुलै 2023 रोजी नोएडा पोलिसांनी सीमा गुलाम हैदरला 14 विदेशी कायदा आणि गुन्हेगारी कट अंतर्गत अटक केली आहे. सीमा हैदर 2020 मध्ये ऑनलाईन गेम पब्जीच्या माध्यमातून सचिन मीणाच्या संपर्कात आली होती. यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दोघांचा संवाद सुरू झाला.

02
दरम्यान, 10 मार्च 2023 ला सीमा हैदर नेपाळला आली आणि सचिन मीणासुद्धा 10 मार्चला भारतातून नेपाळ येथे पोहोचला होता. 10 मार्च ते 17 मार्च 2023 पर्यंत सीमा आणि सचिन नेपाळच्या काठमांडू येथे सोबत राहिले. यानंतर 17 मार्चला सीमा पाकिस्तानला चालली गेली आणि त्यानंतर दुबईमार्गे पुन्हा नेपाळच्या काठमांडूमार्गे बेकायदेशीर पद्धतीने 13 मेला भारतात घुसली.

03
सीमा हैदर 13 मेपासून भारतातील तिचा प्रियकर सचिन मीणासोबत नोएडातील रबूपुरा येथे भाड्याच्या घरात राहत होती. याबाबतची माहिती मिळाल्यावर रबूपुरा पोलिसांनी सचिन मीणा, सीमा गुलाम हैदर, सचिनचे वडील नेत्रपाल यांना अटक करुन तुरुंगात टाकले. सध्या तिन्ही आरोपी जामिनावर बाहेर आहेत.

04
असे सांगितले जात आहे की, सीमा हैदरचा पती 2019मध्ये सऊदी अरबमध्ये नोकरी करत होता. सीमाचा पती घरखर्चासाठी प्रत्येक महिन्याला 70 ते 80 हजार रुपये पाठवत होता. घरखर्चानंतर प्रत्येक महिन्याला सीमा ही 20 ते 25 हजार रुपये वाचवत होती. सीमाने आपल्या गावात 10 हजार रुपयांच्या 20 महिन्याच्या कालावधीसाठी दोन भिशीपण टाकल्या होत्या. दोन्ही भिशी खुलल्यावर तिच्याजवळ दोन लाख रुपये जमा झाले होते. भिशी आणि बचतीचे पैसे या माध्यमातून सीमाने 12 लाख रुपयांमध्ये एक घर खरेदी केले होते.

05
तीन महिन्यांनतरच सीमाने ते घर 12 लाख रुपयांमध्ये विकले होते. सचिनजवळ भारतात येण्यासाठी सीमा हैदरने आपले घर विकले. पहिल्यांदा 10 मार्च 2023 ला टूरिस्ट व्हिसावर कराची एअरपोर्टवरुन शारजाह एअरपोर्ट आणि मग तिथून काठमांडूच्या मार्गे सीमा हैदर भारतात पोहोचली होती. 17 मार्चला ती याच मार्गाने ती नेपाळवरुन कराची परत गेली होती.

06
दरम्यान, 8 मार्चला 2023 ला सचिन मीणा हा नोएडावरुन गोरखपूर येथे पोहोचला. यानंतर 9 मार्चला तो गोरखपूरवरुन सोनौली बॉर्डरच्या माध्यमातून काठमांडू नेपाळ येथे पोहोचला. 10 मार्च ते 17 मार्च पर्यंत सचिन आणि सीमा न्यू विनायक हॉटेल काठमांडू येथे राहिले. सीमा हैदर दुसऱ्यांदा 10 मे ला 15 दिवसांच्या टूरिस्ट व्हिसाच्या माध्यमातून पाकिस्तानातून आपले चार मुले घेऊन काठमांडू पोहोचली होती. याठिकाणी आल्यावर ती पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्येबसून मुलांसह पोखरा नेपाळ येथे पोहोचली होती.

07
यानंतर सीमा 12 मे 2023 रोजी सकाळच्या सुमारास पोखरा नेपाळ येथून बसने रुपनदेही खुनवा बॉर्डर जिल्हा सिद्धार्थ उत्तरप्रदेशात पोहोचली होती. सीमा सिद्धार्थ नगरहून लखनऊ, आगरच्या मार्गे 13 मार्चला नोएडा येथे पोहोचली. यानंतर सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणा हा नोएडाच्या रबूपुरा येथे एका भाड्याच्या घरात राहू लागले. सीमा हैदर या प्रकरणाने सध्या देशात खळबळ उडाली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सीमा हैदर पाकिस्तानमध्ये आपले घर विकून आपला प्रियकर सचिनला भेटायला नोएडा आली होती. 4 जुलै 2023 रोजी नोएडा पोलिसांनी सीमा गुलाम हैदरला 14 विदेशी कायदा आणि गुन्हेगारी कट अंतर्गत अटक केली आहे. सीमा हैदर 2020 मध्ये ऑनलाईन गेम पब्जीच्या माध्यमातून सचिन मीणाच्या संपर्कात आली होती. यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दोघांचा संवाद सुरू झाला.

    MORE
    GALLERIES