जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! अवघ्या 6 तासात तरुणीने कमावले 8 कोटी रुपये, नेमकं काय करते?

काय सांगता! अवघ्या 6 तासात तरुणीने कमावले 8 कोटी रुपये, नेमकं काय करते?

डॅनियल ब्रेगोली

डॅनियल ब्रेगोली

पैसे कमावण्यासाठी सगळेच निरनिराळे काम करत असतात. काहीजण अगदी कमी वयात काम करायला सुरुवात करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जानेवारी : पैसे कमावण्यासाठी सगळेच निरनिराळे काम करत असतात. काहीजण अगदी कमी वयात काम करायला सुरुवात करतात. काहींना कुटुंबाच्या बिकट परिस्थितीमुळे काम करावं लागतं तर काहीजण आपल्या आवडीमुळे आवडत्या क्षेत्रात काम करण्यास सुरु करतात. असे अनेक लोक आत्तापर्यंत व्हायरल झालेले आहेत ज्यांनी काहीतरी वेगळं, हटके, विचित्र गोष्टी करुन पैसा कमावला आहे. अशाच आणखी एका व्यक्तीविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत जिने अगदी कमी वयात खूप संपत्ती कमावली. अवघ्या 6 तासात 8 कोटी रुपये कमावल्याचा दावा एका 19 वर्षीय मुलीने केला आहे. ही घटना 2021 मधील असल्याचं समोर आलं आहे. डॅनियल ब्रेगोली असे मुलीचं नाव आहे. ब्रेगोली व्यवसायाने रॅपर आणि मॉडेल आहे . ती म्हणते की तिने करोडोंची संपत्ती केली आहे. ब्रेगोली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 16.2 मिलियन फॉलोवर्स आहे. अमेरिका स्थिक ब्रेग्रोली म्हणते, ती इन्साग्राम पोस्ट व्यतिरिक्त ती लोकांकडून खाजगी सत्रांसाठीही पैसै घेते. हेही वाचा - Teacher Viral Video : विद्यार्थ्यांचा डान्स पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली शिक्षिका, उत्साहात केलं भलतंच… ब्रेगोली मुख्यतः OnlyFans वेबसाइटद्वारे कमाई करते. तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लोक तिला डॉलरमध्ये पैसे देतात. डिरेक्ट मेसेजद्वारे बोलण्यासाठी वेगळी फी घेते. OnlyFans च्या प्रवक्त्याने Variety.com ला पुष्टी केली की ब्रेगोलीने 6 तासांत 8 कोटी रुपये कमावले. ब्रेगोलीने 2021 मध्ये ही कमाई केली.

जाहिरात

स्वत:ला फॅशन आयकॉन मानणाऱ्या ब्रेगोलीचे म्हणणे आहे की, तिचे ग्रूमिंग कोणी केले नाही. तिच्या यशाचे पूर्ण श्रेय ती स्वतःला देते. तिचे सर्व निर्णय ती स्वतः घेते. आणि ती अगदी लहान असल्यापासून ती हे करत आहे. तिच्या कमाईची पावतीही तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. ती म्हणते की तिने एका वर्षात 52 मिलिन डॉलर कमावले.

News18लोकमत
News18लोकमत

डॅनियल ब्रेगोलीचं म्हणणं आहे, काही लोकांना तिच्या कमाईपासून अडचण आहे की, एवढ्या कमी वयात तिने एवढे पैसै कसे कमावले. त्यामुळे लोक टीका करतात. ती सोशल मीडियावर सक्रिय असून विविध फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात