जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बाबा बनताच हा अभिनेता होतोय ट्रोल; काय आहे कारण?

बाबा बनताच हा अभिनेता होतोय ट्रोल; काय आहे कारण?

बाबा बनताच हा अभिनेता होतोय ट्रोल; काय आहे कारण?

या अभिनेत्याने लग्न केवळ एका महिलेशी केले आहे. मात्र त्याचे 6 वेगवेगळ्या महिलांशी संबंध आहेत आणि प्रत्येक स्त्री त्याच्याशी संबंध ठेवल्यानंतर आई बनली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 05 ऑक्टोबर : आपल्या आयुष्यात लग्न आणि त्यानंतर आई बाबा होणे या दोन गोष्टी खूप आनंददायी असतात. बाळाच्या जन्मानंतर घरातलं वातावरणच बदलून जातं. घरातले सर्व लोक, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वजण खूप खुश असतात आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतात. मात्र एका अभिनेत्यासोबत जरा वेगळंच घडत आहे. बाबा झाल्यानंतर या अभिनेत्याला लोकांनी शुभेच्छा देण्या ऐवजी ट्रॉल करत आहेत. हा प्रसिद्ध अभिनेता, कॉमेडियन आणि अमेरिकेचा होस्ट तुमची विचारसरणी नक्की बदलेल. निक कॅनन या 41 वर्षीय अभिनेत्याला 10 मुलं आहेत. निकने स्वतः ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. निक कॅननने 10 वा मुलगा झाल्यानंतर इंस्टाग्रामवर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. त्याबद्दल त्याने कुटुंबीयांचे आभार मानले. अभिनेता, संगीतकार आणि टीव्ही होस्ट कॅननने अल्पावधीतच वेगवेगळ्या महिलांसोबत संबंध प्रस्थापित करून मुलांचा पिता झाला आहे. विशेष म्हणजे ही मुलं चुकून जन्माला आली नसल्याचं स्वतः कॅननने म्हटलं आहे. उलट प्रत्येक गर्भधारणेचे नियोजन होते. मात्र यामुळेच सोशल मीडियावर लोक कॅननला ट्रोल करत आहेत.

नोकरी गेली तर तरुणीने सुरू केली भटकंती, आता घर सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये आयुष्य

6 महिलांपासून 10 मुले अभिनेता कॅननने लग्न केवळ एकाच महिलेशी केले आहे. मात्र त्याचे 6 वेगवेगळ्या महिलांशी संबंध आहेत आणि प्रत्येक स्त्री त्याच्याशी संबंध ठेवल्यानंतर आई बनली आहे. त्याचे 10 वे मूल मॉडेल ब्रिटनी बेल हिच्यापासून झाले आहे. 28 सप्टेंबर रोजी ब्रिटनी तिसऱ्या अपत्याची आई झाली.

News18लोकमत
News18लोकमत

असे बोलले जात आहे की, कॅनन 11 व्या बाळाचादेखील पिता होणार आहे. डीजे एबी डी रोजासोबत त्याला जुळी मुले आहेत. अॅबी पुन्हा आई बनणार आहे. त्याला आणि मॉडेल अॅलिसा स्कॉटला मुलगाही झाला. पण मेंदूच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात

आता 11 व्या बाळाची वाट पाहत आहे एक वडील म्हणून कॅनन मुलांची काळजी कशी घेतो, असा प्रश्न पडतो. यूएसए टुडेशी बोलताना तो म्हणाला, ‘जर मी माझ्या मुलांसोबत शारीरिकदृष्ट्या एकाच शहरात नसलो तर मी फेसटाइमद्वारे शाळेत जाण्यापूर्वी त्यांच्याशी बोलतो. शिवाय शाळा सुटल्यावर मी पण आणायला जातो.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात