जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नोकरी गेली तर तरुणीने सुरू केली भटकंती, आता घर सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये आयुष्य

नोकरी गेली तर तरुणीने सुरू केली भटकंती, आता घर सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये आयुष्य

नोकरी गेली तर तरुणीने सुरू केली भटकंती, आता घर सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये आयुष्य

एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा हॉटेलमध्ये राहणं अधिक स्वस्त असतं असं तिनं तिच्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : जगभ्रमंतीची आवड असेल, तर आता ते करिअर म्हणूनही निवडता येऊ शकतं. इतकंच नाही, तर त्यातून उत्तम पैसेही मिळू शकतात. नोकरी गेलेल्या अ‍ॅश्लीनं हेच केलं आणि आता ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनली आहे. ती अनेकवेळा कोणत्या ना कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्येच असते. एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा हॉटेलमध्ये राहणं अधिक स्वस्त असतं असं तिनं तिच्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तिच्या या प्रवासाबद्दल ‘आज तक हिंदी’नं वृत्त दिलं आहे. अ‍ॅश्ली ही एक युट्युब ब्लॉगर म्हमजे व्ह्लॉगर आहे. त्याआधी ती कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करत होती. तिची नोकरी 2019 मध्ये गेली. त्यानंतर तिनं या वेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला. तिची फिरण्याची आवड तिला उपयोगी पडली. ती ट्रॅव्हल व्ह्लॉग तयार करते. त्यासाठी विविध ठिकाणी फिरते. आता ती सोशल मीडिया इफ्लुएन्सरही बनली आहे. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅफिलिएट प्रोगॅमची ती सदस्य आहे. त्यामुळे तिच्या फॉलोअर्सनी काही खरेदी केलं तर तिला मनी बॅकचा फायदा मिळतो. या शिवाय ती पार्टटाईम ट्रॅव्हल एजंट म्हणूनही काम करते. तिच्या फॉलोअर्ससाठी ती ट्रिप तयार करते.

    जाहिरात

    अ‍ॅश्ली तिच्या ट्रॅव्हल व्ह्लॉगसाठी विविध ठिकाणी जाते, राहते. त्यात 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं तिला जास्त आवडतं. अपार्टमेंटच्या तुलनेत तो स्वस्त पर्याय असल्याचं तिला वाटतं. ज्या हॉटेलमध्ये जेवण मोफत असतं, तिथे राहायला तिला आवडतं, असं ती म्हणते. मॅरिएट प्रॉपर्टीजमध्ये 2020मध्ये मी 3.5 लाख रुपयांमध्ये 103 रात्री राहिले, असं ती सांगते. इथे राहण्याचा फायदा म्हणजे इथे रोज सकाळचा नाश्ता मोफत मिळतो, हे सांगायला ती विसरत नाही. वेगवेगळ्या हॉटेलमधील वास्तव्य, जेवण यांच्याबद्दल ती तिच्या व्ह्लॉग म्हणजे व्हिडिओमध्ये माहिती देते. तिच्या एका व्ह्लॉगमध्ये तिनं एक खास दिवस दाखवला आहे. त्यात चिकन एनचिलाडास, एक फळांची डिश, हर्बल टी आणि कॉफी ऑर्डर करताना तिनं व्हिडिओ तयार केला आहे. ही सगळी ऑर्डर विनामूल्य तिच्या रूममध्ये आणण्यात आली. नाश्त्यानंतर ती तिच्या कामाला लागली. त्याबाबत ती म्हणते, की माझ्या कामाविषयी सगळे गोंधळलेले असतात. मी पूर्ण वेळ प्रवास करते. पण लोकांना माहीत नसलेल्या आणखीही काही गोष्टी मला कराव्या लागतात. प्रामाणिकपणे सांगायचं, तर या गोष्टी काही एक्सायटिंग नसतात. खूप मेहनतीच्या असतात. अ‍ॅश्ली तिचा बराचसा वेळ व्ह्लॉग एडिट करण्यात घालवते. तिच्या युट्युब चॅनलवर तिला ते अपलोड करायचे असतात. आणखी पैसे मिळवण्यासाठी तिनं स्वतः तयार केलेल्या प्रवासासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्सच्या कोर्सबद्दलही ती त्यात माहिती देते. फिरण्याच्या आवडीमुळे तिने त्यात स्वतःचं करिअर केलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे 5 स्टार सुविधा कमीतकमी दरात कशा मिळतील, याबाबत ती व्ह्लॉगमधून सांगते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: travel
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात