मुंबई, 10 जून : देशात कोरोना व्हायरसचं महासंकट आहे. सर्वजण या संकटाचा सामना करत आहेत. टप्प्याटप्प्यात अर्थव्यवस्थेचा एका भाग खुला होत असतानाच आता सोशल मीडियावर काही भन्नाट फोटो व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात सर्वात जास्त रस्त्याच्या दुर्तफा पाहायला मिळत असतील तर ती इंग्लिश स्पीकिंग कोर्सची पोस्टर्स. इंग्रजी लिहिणं आणि बोलण्याबाबत फारच मनात भीती असल्यानं दोन्हीत आपण कमजोर पडतो अशावेळी क्लास इंग्रजीचा क्लास लावून शिकण्यासाठी पालक मागे लागतात. स्पोकन इंग्लिशच्या क्लासची भन्नाट जाहिरात रस्त्यांच्या बाजूला भिंतीवर केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
English सिखाएगा या डकैती 😂 pic.twitter.com/0b0EZy1y2i
— Pankaj Nain IPS (@ipspankajnain) June 9, 2020
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो पाहून अनेकांना अक्षरश: हसू आवरत नाहीय.
रोड़ रोल्लर बॉडी मस्साज😉 pic.twitter.com/jWCSY1DUai
— Naveen Bhardwaj (@wrwre) June 9, 2020
या मजेशीर जाहिराती वाचून सोशल मीडियावर युझर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. अनेक लोकांना कोरोनामुळे आलेलं टेन्शन आणि ताण या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे दूर झाल्याचंही काही युझर्सनी म्हटलं आहे. या पोस्टर्समुळे युझर्सचं तुफान मनोरंजन झालं आहे. या पोस्टरनंतर आणखीन काही भन्नाट फोटो युझर्सनी शेअर केले आहेतत. रोड रोलरचा फोटो अपलोड करून त्यावर असलेली बॉडी मसाज 499 रुपयांमध्ये हा फोटोही तुफान व्हायरल झाला आहे. या पोस्टर्सनी युझर्सला हसू आवरेना झालं आहे. हे वाचा- तीर्थ समजून प्यायला सॅनिटायझर, सुनील ग्रोवरने शेअर केला VIDEO हे वाचा- अजब केमिस्ट्री! ऑनलाइन क्लास घेण्यासाठी केला जुगाड, VIDEO VIRAL संकलन, संपादन- क्रांती कानेटकर