लिस्बन, 9 जुलै : कोणत्याही फ्लाइटच्या टेक-ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी लोकांना भीती वाटते. मात्र पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो इंटरनॅशनल एयरपोर्टवरील (Portugal, Cristiano Ronaldo International Airport ) एक व्हायरल व्हिडीओ पाहिला तर हैराणच व्हाल. हा एअरपोर्ट जगातील सर्वात भीतीदायक एअरपोर्टपैकी एक मानला जातो. येथे विमान नियंत्रणात ठेवणं एक आव्हान आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानाचं लँडिग पाहायला मिळत आहे.
टिक-टॉकवर शेअर केलेला हा व्हिडीओ विमानाच्या कॉकपिटमधून शूट करण्यात आला आहे. हे विमान लँड करणं एक मोठं आव्हान आहे. कारण 500 फूट खाली वाऱ्याचा वेग जास्त आहे. येथे नियमित असंच काहीचं वातावरण असतं. त्यामुळे सर्वच पायलटना येथे विमान उडविण्याची परवानगी दिली जात नाही.
हृदयाचे ठोके वाढले...
व्हिडीओमध्ये पाहू शकता की छोट्याशा रनवेवर टर्बुलेन्सच्या मधून विमान यशस्वीपणे लँडिग करतं आणि यादरम्यान पाहताना हृदयाचे ठोके वाढतात. रूट्स ट्रॅव्हलरच्या एका आर्टिकलनुसार येथे सुरुवातील एक छोटा रनवे होता. त्यामुळे 1977 मध्ये एका विमानाने तटाला टक्क दिली होती. यात विमानाचा ब्लास्ट झाला आणि 131 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर रनवे वाढविण्यात आला, मात्र डोंगराळ भाग असल्याने बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. येथे वातावरण खराब असल्याकारणाने विनान क्रॅश होण्याची भीती असते. यासाठी प्लेन उडविण्यासाठी काही ठराविक पायलटांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हे ही वाचा-VIDEO : आंदोलन आहे की लग्नाचा मंडप? वऱ्हाड्यांच्या घोषणांनी कार्यालय दुमदुमलं
सर्वात डेंजर एअरपोर्ट कोणता?
इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार जगातील सर्वात धोकादायक एअरपोर्ट नेपाळमधील तेंजिंग-हिलरी एअरपोर्ट मानला जातो. येथे तब्बल 10 हजार फूट उंचीवर एअरपोर्ट आहे. आणि हिमालयावर असल्या कारणाने वातावरण खराब असतं. दुसऱ्या क्रमांकावर सेंट मार्टेनचं प्रिंसेस ज्युलियाना एअरपोर्टचा नंबर येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airport, Shocking viral video