नवी दिल्ली, 14 जानेवारी : चहा हे अनेक लोकांचं पहिलं प्रेम बनलं आहे. उठता बसता अनेकांना चहा हवाच असतो. 'चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा हवाच' ही म्हण चहाप्रेमींवर बरोबर लागू होते. त्यामुळे आजकाल अनेकजण चहाच्या व्यवसायात चांगले पैसै कमावताना दिसत आहे. लोक चहाच्या क्षेत्रात स्टार्टअप करताना दिसतात. त्यामुळे चहाच्या दुकानाबाहेर तुफान गर्दी पहायला मिळते. अशातच आजकाल चहावालेही अनोख्या स्टाईलमध्ये चहा विकताना दिसतात. अनेकजण निरनिराळ्या शैलीत चहा विकत असतात.
सोशल मीडियावर चहा विक्रेत्यांचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे आपल्या अनोख्या शैलीत चहा विकताना दिसतात. सोशल मीडियावरही लोक या फोटो आणि व्हिडीओंना जोरदार पसंती दर्शवतात. अशातच आणखी एका चहा विक्रेत्याचा हटके व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्याची चहा विकण्याची अनोखी शैली पाहून तुम्हीही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा - हटके स्टाईलने चहा भरणं विक्रेत्याला पडलं महागात, प्लॅस्टिकची पिशवी फुटली अन्...
सध्या व्हायरल होत असलेला चाह विक्रेत्याचा व्हिडीओ अभिनव जेसवानीच्या JUST NAGPUR THINGS या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चहा विकणारी व्यक्ती एकापेक्षा जास्त फिल्मी डायलॉग आणि अनेक कलाकारांची नक्कल करताना दिसत आहे. चहा विकताना तो ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चनपासून सलमान खान, हृतिक रोशन आणि अमरीश पुरीपर्यंत अनेक दिग्गजांची मिमिक्री करताना दिसत आहे.
View this post on Instagram
चहा विक्रेत्याचे हे अनोखे टॅलेंट पाहून सगळेच थक्क झाले आहेत. नेटकरी कलाकारांची नक्कल करणाऱ्या चहा विक्रेत्याच्या प्रतिभेचे कौतुक करताना दिसतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स सतत कमेंट करत आहेत आणि या व्यक्तीच्या हाताचा चहा पिण्यास उत्सुक आहेत.
दरम्यान, आपण पाहतो की आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवतात आणि प्रत्येकाची स्वतःची वेगळी चव असते. चहाप्रेमी तर चहाच्या दुकानांवर तुफान गर्दी करत असतात. चहा विक्रेतेदेखील ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी हटके आणि अनोख्या युक्त्या वापरुन ग्राहकांना दुकानापर्यंत येण्यास मजबूर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Tea, Tea drinker, Top trending, Viral news, Viral post, Viral videos