जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बटाटा, पनीर किंवा चिकन नाही, तरुणाने भाजून खाल्ला असा पदार्थ, Video पाहून येईल उल्टी

बटाटा, पनीर किंवा चिकन नाही, तरुणाने भाजून खाल्ला असा पदार्थ, Video पाहून येईल उल्टी

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

तुम्ही आजपर्यंत वचित्र पदार्थांबद्दल ऐकला असाल, पण हा पदार्थ खूपच विचित्र आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे बऱ्याचदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात ज्या आपल्या कल्पना शक्तिच्या ही पलिकडले असतात. असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जो चर्चेचा विषय ठरल आहे. तुम्ही लोकांनी पनील, बटाट किंवा चिकन रोस्ट करुन खाताना पाहिलं असेल, पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील व्यक्ती असा पदार्थ खात होता की ज्याबद्दल ऐकून तुम्हाला उलटी येईल. खोटं सांगून कर्मचाऱ्याने घेतली सुट्टी, बॉसला अशा अवस्थेत सापडला की थेट गेली नोकरी तुम्ही आजपर्यंत वचित्र पदार्थांबद्दल ऐकला असाल, पण हा पदार्थ खूपच विचित्र आहे. खरंतर ही व्यक्ती आपल्या बार्बीक्यू मशिनवर सरडा भाजून खात होता (Roasted Chameleon Weird Dish Video). @crabolita या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्राण्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती सरड्याचे डंपलिंग किंवा भज्जी बनवताना दिसत आहे. मांसमध्ये कोंबडी, मासे किंवा बकऱ्यापासून बनवलेले पदार्थ खाणे सामान्य आहेत, परंतु सरड्याला भाजून खाणे हा एक किळसवाणा अनुभव असू शकतो. परंतू काही नेटकरी आवडीने हा व्हिडीओ पाहात आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती काही सरड्यांना आगीत भाजून घेतो आणि नंतर त्यांची त्वचा काढून टाकतो. त्यानंतर तो चुलीवर ठेवून छान तळतो. त्यात तो मीठ आणि मसालेही टाकतो आणि नीट शिजल्यावर तो आरामात बसून खाताना दिसत आहे. त्याच्या प्रतिक्रियेवरून असे दिसते की त्याला तो पदार्थ खूप चवदार वाटत आहे. या व्हिडीओला लोकांनी अनेक वेळा पाहिलं आहे, शिवाय अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स आणि शेअर देखील केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात