मुंबई : सुट्या मिळाल्या तर कोणाला आवडत नाही. सुट्टी घेऊन कुठे तरी फिरायला जाणं, वेळ घालवणं लोकांना फार आवडतं. शिवाय कधी-कधी आजारी पणामुळे देखील काही लोक सुट्या घेतात. पण बऱ्याचदा सुट्या सहजासहजी मिळणं शक्य होत नाही. मॅनेजर किंवा बॉस जेव्हा सहज सुट्टी देत नाही, तेव्हा मात्र कार्मचाऱ्याची चांगलीच पंचायत होते. पण आता कर्माचारी देखील हुशार झाले आहेत, काही लोक खोटं बोलून कंपनीकडू सुट्या घेतात. असं आपल्यापैकी बऱ्याचदा अनेकांनी कधीना कधी केलंच असेल. पण फार कमी लोक असतील जे खोटं बोलल्यावर पकडले गेले असतील. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं.
एका कर्मचाऱ्याने खोटं कारण देत बॉसकडून सुटी घेतली होती, मात्र काही दिवसांतच त्याचे गुपित उघड झालं. वास्तविक, मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण चीनमधील एका खासगी कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दीर्घकाळ सुट्टीची गरज होती. त्याला एक-दोन दिवस सुट्टी मिळायची पण मोठी सुट्टी घेणं त्याला शक्य होत नव्हतं. याआधीही त्याने अनेक छोटे-मोठे बहाणे केले होते, पण तेव्हा त्याला सुट्टी न मिळाल्याने त्याने आता मोठा बहाणा केला आणि त्यातच फसला. त्यांने सांगितले की त्यांला एक आजार आहे आणि त्यांना विश्रांती घेण्याच्या सूचना डॉक्टरकडून देण्यात आल्या आहेत. लग्नाचा आनंद क्षणात संपला, मंडपात घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ पाहण्याची हिंमत असेल तरच पाहा हे कारण देऊन त्याने सुट्टी घेतली आणि तो फिरण्यासाठी गेला. दुसऱ्याच दिवशी तो त्याच्या सामानासह विमानतळावर पोहोचला, पण विमानतळावर पोहोचताच त्याच्या बॉसने त्याला पाहिले आणि त्याचं सर्व खोटं उघड झालं. तो कुठल्यातरी बेटावर फिरायला जाणार होता, पण त्याचा प्लान पुरता फसला. या तरुणाला रंगेहाथो पकडल्यानंतर कंपनीने त्याच्यावर कारवाई केली. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर तो कोर्टात गेला आणि कोर्टाने कंपनीला समन्स बजावून कंपनीला दंड ठोठावला. मात्र कंपनीने पुराव्यासह न्यायालयात दाद मागितल्यावर हे प्रकरण उलटले. न्यायालयाने निर्णय बदलून या व्यक्तीला तो चुकीचा असून त्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा कंपनीचा निर्णय योग्य असल्याचे आदेश दिले.