मुंबई 27 सप्टेंबर : कोणाचे नशीब केव्हा आणि कधी पलटेल हे कोणालाच सांगता येणार नाही. काही लोक कठोर परिश्रम करुन देखील त्यांचं आयुष्य बदलत नाही, परंतू काही लोकांचं रातोरत असं काही आयुष्य बदलतं की, ज्याचा आपण कधी स्वप्नात देखील विचार केला नसावा. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं, त्याला त्याच्या वडिलांचं 60 वर्षांपूर्वीचं पासबुक सापडलं, ज्यामुळे तो कोट्यवधींचा मालक झाला. ज्यामुळे या घटनेची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा होत आहे. आता तुमच्या मनात देखील याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल, की नक्की काय घडलं? मग चला याबद्दल जाणून घेऊ. हे वाचा : महिलेच्या घरातील भिंतीतून बाहेर पडू लागलं रक्त, प्लंबरला बोलावताच समोर आलं धक्कादायक रहस्य खरंतर या व्यक्तीच्या वडिलांनी 1970 मध्ये हिनोजोसा येथे घर विकत घेतले. यावेळी या घराची रक्कम 12 हजार 684 रुपये होती. परंतू वडिलांचे निधन झाल्यावर या व्यक्तीने त्यांचं सगळं सामान एका डब्यात भरुन ठेवलं होतं, परंतू एकेदिवशी जेव्हा त्याने तो डब्बा उडला, तेव्हा त्याचं नशिब देखील पलटलं. खरंतर या व्यक्तीला त्या डब्यात जुन्या वस्तुंसोबत आपल्या वडिलांच्या बँकेचे पासबुक सापडले, तसेच त्यात लेखी राज्य हमी सापडलं. व्याजदरानुसार याची किंमत 14 लाख झाली. ज्याची आजच्या तारखेला भारती रुपयांमध्ये 933 कोटी आहे. हे वाचा : 25 कोटींची लॉटरी लागली, तरी रिक्षा चालकावर आली पश्चातापाची वेळ, नक्की असं काय घडलं? पण हे पैसे मिळवणे तसे सोपे नव्हते, ज्यामुळे ते मिळवणयासाठी या व्यक्तीने खूप प्रयत्न केले, अखेर सर्वोच्च न्यायालयाने या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दहा लाख डॉलरच्या बँक पासबुकवर दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही रक्कम त्याला दिली, ज्यानंतर ही व्यक्ती सुखी आणि आनंदी जीवन जगू लागली. या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर माहिती मिळताच, अनेक लोक याबद्दल चर्चा करु लागले आहेत. अनेकांनी या व्यक्तीचं कौतुक देखील केलं आहे.