मुंबई 15 सप्टेंबर : प्रेमात आणि लढाईत सगळ्या चूका माफ असतात असं म्हणतात. याबद्दल लोक अनेक उदाहरण देखील देत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. परंतू विचार करा की प्रेम करतानाच चूक केली असेल तर? अशावेळी त्या प्रेमाला काय किंमत उरते? एक असंच फसवणूकीचं प्रकरण समोर आलं आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्च सुरु आहे. खरंतर ही प्रेम कहाणी एका मिस कॉलपासून सुरु झाली आणि नंतर भांडणापर्यंत पोहोचली, आता हे भांडण काही साधं-सुद्धं नव्हतं, तर चक्क या तरुणीने आपल्या नवऱ्याला रस्त्यावर सर्वांसमोर चपलीनं मारलं. खरंतर एका तरुणाचा चुकून एका तरुणीला फोन आला. ज्यानंतर या दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली. अखेर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी ही लग्न करण्याचा निश्चय केला आणि त्यांनी लग्न देखील केलं. ज्यानंतर हे जोडपं दिल्लीला राहण्यासाठी गेलं इथपर्यंत सर्व ठिक सरु होतं, परंतू त्यानंतर सगळा गोंधळ झाला. हे वाचा : ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, त्याला बायको आणि ट्रांसजेंडर दोघांशी थाटायचा होता संसार कारण… कारण या मिस्कॉलपासून सुरु झालेल्या प्रेम कहाणीने एका महिलेचं आयुष्य 360 डिग्री बदललं. कारण तिच्या नवऱ्यानं तिला तो अविवाहित असल्याचं सांगितलं. परंतू खरंतर या व्यक्तीचं आधीच लग्न झालंय आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं, जेव्हा हा व्यक्ती आपल्या दुसऱ्या बायकोला घेऊन आपल्या गावी बेलाला परतला. जेव्हा या तरुणीला तिच्या नवऱ्याच्या या प्रकाराबद्दल कळलं तेव्हा दोघांमध्ये भांडण वाढलं आणि घटस्फोट देण्यासाठी दोघेही कोर्टात आले, पण पती वेळेवर कोर्टात पोहोचू शकला नाही. ज्यामुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. अखेर या महिलाला आपला नवरा कोर्टा बाहेर दिसला तेव्हा तिला राग आनावर झाला, ज्यानंतर तिने त्याला सर्वांसमोर रस्त्यावर चपलीने मारले. हे वाचा : फोटो पाहून सांगा चूक कोणाची? विंडो सीटच्या या SCAM ला नेटकरी करतायत ट्रोल सुरुवातीला तो नवरा त्याच्या बायकोच्या तावडीतून निसटला, मात्र तेथे उपस्थित लोकांनी त्याला पकडले. पकडल्यानंतर लोकांनी पतीला पत्नीच्या ताब्यात दिले, त्यानंतर तिने त्याला खूप मारहाण केली. नंतर स्थानिकांच्या पुढाकाराने प्रकरण शांत झाले. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक दोघांच्याही कृत्याला दोष देत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.