मुंबई 4 सप्टेंबर : बऱ्याचदा अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कानावर पडतात की, ते ऐकून आपल्याला त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याने नात्यामधील गुंतागुंतीचे सर्वात मोठे रहस्य उघड केले आहे. जे सगळ्यांसाठीच धक्कादायक आहेत. आपण बऱ्याचदा गंमत म्हणून अशा अनेक गोष्टी करतो, ज्याचा निकाल चूकीचा लागतो किंवा आपल्या अंगाशी येतं. असंच मस्करीत एका प्रेमीजोडप्यानं डीएनए टेस्ट केली, पण त्याचा जो रिजल्ट आला, तो फारच भयंकर होता. आता हे ऐकून तुमच्या मनात नक्कीच उत्सुक्ता निर्माण झाली असेल की, त्या रिजल्टमध्ये नक्की काय असेल. चला तर हे प्रकरण नीट समजून घेऊ. तरुणीने सोशल मीडियावर त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. तरुणी म्हणाली, ‘‘मी 30 वर्षांची आहे. मी एका 32 वर्षांच्या मुलासोबत 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो, पण अलीकडेच मला कळले की, मी ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती, ती व्यक्ती माझा भाऊ आहे. आता मला खूप विचित्र वाटत आहे.’’ हे वाचा : त्याने रेस्टराँमध्ये तिला प्रपोज केलं, ती नाही म्हणाली! पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO ते दोघेही लवकरच पुन्हा चाचणीसाठी जाणार आहेत. तरुणीने पोस्टमध्ये सांगितले की, याआधी ती इतक्या लवकर कोणाच्याही जवळ आली नव्हती. पण तिला हा तरुण खूप आवडला. तरुणीने पुढे असं सांगितलं की, तिला हायस्कुलमध्ये कळालं की तिला कोणीतरी दत्तक घेतलं आहे. तसेच तिच्या जोडीदारालाही कोणीतरी दत्तक घेतलं आहे. लहानपणी भाऊ-बहिण वेगळे झाल्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना एकमेकांना ओळखता आलं नाही. ज्यामुळे हा सगळा घोळ झाला असावा असं तिला वाटतंय. हे वाचा : जगातील असं रहस्यमय ब्रिज, ज्यावर जाताच आत्महत्या करतात कुत्रे, वाचा संपूर्ण माहिती मुलीचे म्हणणे आहे की, डीएनए चाचणीने तिचे आणि तिच्या प्रियकराचे खरे नाते उघड झाले. सुरुवातीला मला आश्चर्य वाटले, पण मी माझ्या प्रियकराला याबद्दल सांगितले नाही. तिला आता त्याला काही सांगायचे नाही. ती प्रार्थना करत आहे की, हा रिपोर्ट चुकीचा असावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.