मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Live शोमध्ये अँकरने गिळली माशी, ती १ सेकंद थांबली आणि... Video सोशल मीडियावर व्हायरल

Live शोमध्ये अँकरने गिळली माशी, ती १ सेकंद थांबली आणि... Video सोशल मीडियावर व्हायरल

अँकरची खूप वाईट अवस्था झाली, होती परंतू हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स मात्र त्यांचं हसू रोखू शकत नाहीत.

अँकरची खूप वाईट अवस्था झाली, होती परंतू हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स मात्र त्यांचं हसू रोखू शकत नाहीत.

अँकरची खूप वाईट अवस्था झाली, होती परंतू हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स मात्र त्यांचं हसू रोखू शकत नाहीत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 4 सप्टेंबर : आपल्याला दररोज सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. यांपैकी काही व्हिडीओ हे आपल्याला पोट धरुन हसवणारे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही तुमचं हसू रोखू शकणार नाही.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ एका अँकरचा आहे. ज्यामध्ये अँकरसोबत असं काही घडतं जे खूपच मजेदार आहे.

तुम्ही टीव्हीवर देखील अनेक अँकर्सला बातम्या वाचताना पाहिले असणार. टीव्हीवर आपण त्यांना पाहातो तेव्हा सर्व काही सामान्य वाटतं, परंतू त्यांच्यासोबत बऱ्याचदा अशा काही घटना घडतात ज्या त्यांच्यासाठी अप्रिय असतात. हा समोर आलेला व्हिडीओ देखील असाच आहे.

नुकताच कॅनडामध्ये राहणाऱ्या एका अँकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बातमी वाचताना अँकरने हवेत उडणारी माशी गिळली.

हे वाचा : तुर्कीश आईस्क्रीम विक्रेता आईस्क्रीम देत नाही, म्हणून लहान मुलानं लढवली शक्कल... पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसे पाहाता अँकरची यावेळेला खूप वाईट अवस्था झाली, परंतू हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स मात्र त्यांचं हसू रोखू शकत नाहीत.

व्हायरल व्हिडीओमध्ये अँकरिंग करताना अँकरने चुकून माशी गिळली. तिने माशी गिळताच ती थोडा वेळ थांबली, पण तिने तिचे रिपोर्टिंग चालूच ठेवले. त्यानंतरचे तिचे एक्सप्रेशन पाहाण्यासारखे होतो.

फराह नासर असे या अँकरचे नाव आहे. ती कॅनडाच्या ग्लोबल न्यूज चॅनलमध्ये अँकर आहे.

हे वाचा : भरधाव कारने ऑटोला दिली धडक, रस्त्यावरुन चालणारी महिला दोघांमध्ये अडकली पण... धक्कादायक Video Viral

हा व्हिडीओ तिने स्वत: तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनही लिहिले, ''मी व्हिडीओ शेअर करत आहे जेणेकरून मला हसता येईल. हसणे खूप महत्वाचे आहे. अँकरिंग करताना मी एक माशी गिळली.''

आतापर्यंत या व्हिडीओला 16शेहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

First published:

Tags: Shocking news, Viral news, Viral video.