मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सुंदर दिसणं किती वाईट असू शकतं, हे या तरुणीची कहाणी ऐकून तुम्हाला जाणवेल

सुंदर दिसणं किती वाईट असू शकतं, हे या तरुणीची कहाणी ऐकून तुम्हाला जाणवेल

मिस इंग्लंड नताशा हेमिंग्ज

मिस इंग्लंड नताशा हेमिंग्ज

तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल की हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 2 ऑक्टोबर : आजच्या युगत प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. मग तो मुगला असोत किंवा मुलगी. ज्यामुळे लोक वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्स किंवा वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करतात. ज्यामुळे ते सुंदर देखील दिसू लागतात. लोकांचं असं म्हणणं आहे की, सुंदर दिसल्यामुळे लोकांमध्ये त्यांना इज्जत आणि मान दोन्ही मिळतो. परंतू एका तरुणीच्या बाबती काही उलटंच घडलं.

खरंतर या तरुणीला तिच्या सौंदर्यामुळे स्वत:ला अनेक वर्ष घरातच बंद करण्याची वेळ आली. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल की हे कसं शक्य आहे? पण या तरुणीसोबत खरंच सुंदर दिसल्यामुळे घरात तोंड लपवून बसण्याची वेळ आली, तसेच सौंदर्यामुळे लोकांकडून बोलणी देखील खावी लागली.

ही तरुणी कोणी सामान्य मुलगी नाही, तर ती मिस इंग्लंड नताशा हेमिंग्ज आहे.

मिस इंग्लंड नताशा हेमिंग्ज

हे वाचा : ''असे घाला अंडरगार्मेंट्स...'' पाकिस्तानी एअरलाइंसकडून क्रू मेंबर्ससाठी अनोखा नियम

26 वर्षीय नताशाने तिचे काही अनुभव शेअर करत एक मोठा खुलासा केला आहे. नताशा सांगते की, जेव्हा ती विद्यापीठात शिकत होती, तेव्हा ती खूप सुंदर दिसत असल्यामुळे तिच्या कोणी मैत्रीणी नव्हत्या. तिच्या सौंदर्यामुळे मुलं दुसऱ्या मुलींकडे पाहायचे नाहीत, ज्यामुळे मुलींनी तिच्याशी बोलणं आणि फिरणं बंद केलं.

एवढंच नाही तर तिला तिच्या सौंदर्यामुळे लोकांकडून बोलणी खावी लागली. लोक तिला त्रास द्यायचे. ज्यानंतर तिने स्वत:ला घरातच बंद करुन घेतले होते, ती कुठेही बाहेर जायची नाही.

अखेर एक दिवस तिने ब्युटी स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती ते जिंकली देखील आणि अखेर मिस इंग्लंड खिताब 2015-16 मध्ये आपल्या नावे केला. तिने हा खिताब जिंकून सगळ्यांचंच तोंड तिने बंद केलं. ज्यानंतर तिच्या सौंदर्याने तिला मान मिळवून दिला.

हे वाचा : लग्नात पाहुण्याचं असं कृत्य की, वधू-वरांनी व्हिडीओ पाठवून मागितली नुकसान भरपाई

बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की आपल्याच समस्या खूप जास्त आहेत, आपल्याला हे मिळालं असतं तर बरं झालं असतं, ते मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण नताशा एक उदाहरण आहे की तुमच्याकडे सगळं काही असलं तरी देखील लोक तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करतातच, आयुष्यात प्रत्येकालाच फेल्युअर आणि अशा समस्यांचा सामना करावा लागतो. पण यासाठी महत्वाची असते ती आपली जिद्द आणि मेहनत. मग तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही.

नताशा तिच्या प्रवासामुळे आणि तिच्या यशामुळे अनेकांना प्रेरणा देते. लवकरच नताशाचा पहिला म्युझिक अल्बमही रिलीज होणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Social media, Top trending, Viral news