मराठी बातम्या /बातम्या /Viral /

25 कोटींची लॉटरी लागली, तरी रिक्षा चालकावर आली पश्चातापाची वेळ, नक्की असं काय घडलं?

25 कोटींची लॉटरी लागली, तरी रिक्षा चालकावर आली पश्चातापाची वेळ, नक्की असं काय घडलं?

प्रतिकात्मक फोटो, सोर्स गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स गुगल

मच्या मनात आता असा प्रश्न नक्कीच आला असेल की, हे कसं शक्य आहे? कोट्यवधींची लॉटरी लागून तर कोणाला ही आनंद होईल, मग या व्यक्तीला कसं काय दु:ख होऊ शकतं? चला या प्रश्वाचं उत्तर जाणून घेऊ या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kerala, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 25 सप्टेंबर : प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं आणि आपल्याकडे जास्त पैसे यावेत असं वाटत असतं. लोक असाच विचार करतात की एखादी लॉटरी लागावी आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जावं. तुम्हाला जर करोडोंची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? गाडी, बंगला, शॉपिंग, प्रवास इत्यादी गोष्टीं करण्याचा तुम्ही विचार कराल. पण तुम्हाला माहिती आहे का? की एक अशी देखील व्यक्ती आहे, जिला कोट्यवधींची नोकरी लागून देखील ती खूश नाही.

हो, तुम्ही बरोबर वाचलात... तुमच्या मनात आता असा प्रश्न नक्कीच आला असेल की, हे कसं शक्य आहे? कोट्यवधींची लॉटरी लागून तर कोणाला ही आनंद होईल, मग या व्यक्तीला कसं काय दु:ख होऊ शकतं? चला या प्रश्वाचं उत्तर जाणून घेऊ या.

25 कोटी जिंकणाऱ्या व्यक्तीचे नाव अनूप असे आहे आणि तो ऑटोचालक आहे. त्याने आपली बचत पिगी बँक तोडली आणि केरळ सरकारच्या मेगा ओणम राफेल ड्रॉसाठी तिकीट विकत घेतली, ज्याने त्याचे आयुष्य बदलले. कोट्यवधींचा मालक झाल्याचे जाहीर होताच त्यांनी कुटुंबीयांसह आनंदोत्सव साजरा केला.

हे वाचा : फोटो पाहून सांगा चूक कोणाची? विंडो सीटच्या या SCAM ला नेटकरी करतायत ट्रोल

अनुप, ज्यांना केरळ सरकारकडून आयोजित केलेली कोट्यवधींची लॉटरी लागली

पण त्याचा हा आनंद फारकाळ टिकलाच नाही. कारण आता अनूप यांना लॉटरी जिंकून देखील पश्चाताप होत आहे.

'न्यू इंडियन एक्स्प्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अचानक लोकांनी त्यांचे आयुष्य हराम केलं आहे. ज्यामुळे अनूप त्यांच्या मन:शांतीसाठी लोकांपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत आहे.

सोशल मीडियावर आपले दुःख सांगत अनूप म्हणाले, "मी मनःशांती गमावली आहे आणि मी माझ्या घरातही राहू शकत नाही, कारण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला भेटू इच्छिणाऱ्या लोकांनी मला वेढलं आहे. मी अस्वस्थ झाल्यामुळे आता जागा बदलत आहे."

पुढे अनूप यांनी असंही सांगितले की, "मला घराबाहेरही जाता येत नाही. लोक माझ्या मागे लागले आहेत आणि सतत मदत मागत आहेत. यासाठी ते माझ्यावर दबाव आणत आहेत. तसेच माझ्याकडे असे लोक पैसे मागत आहेत, ज्यांना मी ओळखतही नाही."

हे वाचा : समुद्रात सापडले जहाजाचे अवशेष, तर मडक्यांमध्ये सापडल्या अशा वस्तू, आता 'या' रहस्यमयी गोष्टींची होतेय चर्चा

आश्चर्याची गोष्ट आशी की, अनुप यांना सरकारकडून पैसे देखील मिळालेले नाहीत. ज्यामुळे अनूप आता त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट वापरून लोकांना सांगत आहे की त्यांच्याकडे अजून पैसे आलेले नाहीत.

सरकारी नियमांनुसार या लॉटरीवरील टॅक्स वजा केला तर त्यांच्या खात्यात 16 कोटी 25 लाख रुपये येणं आवश्यक आहे. अनूप म्हणाले, 'मदत मागणाऱ्यांमध्ये दूरदूरच्या एनजीओ आणि सामाजिक संस्थांचे लोक देखील येत आहेत. अभिनंदन करण्याच्या बहाण्याने लोक येतात आणि तासनतास घरात बसतात. ज्यामुळे मी अगदी त्रस्त झालो आहे.

First published:

Tags: Money, Social media viral, Top trending, Viral news