मुंबई 9 सप्टेंबर : आपल्या समोर बऱ्याचदा अशा गोष्टी येतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊ बसतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून लोकांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. ही एका महिलेच्या प्रेग्नेंसीची घटना आहे, ज्यामध्ये एका 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. परंतू यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की, या दोन्ही मुलांचे जैविक वडील मात्र वेगळे आहेत.
हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी खरं आहे. पण आता प्रश्न हा उभा राहतो की हे कसं शक्य आहे. कारण जुळी मुलं आणि वडिल वेगळे हे मात्र थोडं धक्कादायकच आहे, परंतू ही घटना सायन्सनं देखील मान्य केली आहे. याला हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन असे म्हणतात, जे मासिक पाळीच्या दरम्यान शरीरात झालेल्या बदलामुळे घडतं.
खरंतर या महिलेने एकाच दिवशी दोन पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवले, ज्यानंतर या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला.
हे वाचा : Viral video : महिलेच्या कानात शिरला साप, पिवळ्या सापाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण
खरंतर महिलेला आधी याबद्दल काहीच ठावूक नव्हतं, परंतू मुलांच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळी तिच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की या मुलांचे वडिल नक्की कोण असतील. कारण या महिलेचे दोन पुरुषांसोबत शारीरीक संबंध होते. तेव्हा मग तिने डीएनए टेस्ट घेण्याचे ठरवले. ज्यानंतर या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला. ज्यानंतर या महिलेलाही आश्चर्य वाटलं. ही घटना ब्राझीलच्या गोइंयासमधील Mineiros शहरातील आहे.
हे वाचा : Video : दारुच्या दुकानात बसून पिण्यासाठी चोरांनी लढवली अजब शक्कल, ते आत तर गेले पण...
याबद्दल महिलेन सांगितलं की, "मला आठवले की मी दुसर्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्याला चाचणी घेण्यासाठी बोलावले, जे मॅच देखील झालं, पण पुढे एक आश्चर्याचा धक्का बसला, कारण दोन्ही मुलांचे डीएनए मॅच झाले नाहीत. मला माहित नव्हते की असे होऊ शकते. परंतू डॉक्टर म्हणाले हे खूप समान आहेत."
महिलेचे फिजिशियन डॉ. तुलिओ फ्रँको म्हणाले की, "एकाच मातेची दोन अंडी वेगवेगळ्या नरांनी फलित केल्यावर असे होणे शक्य आहे. अशा घटना फार कमी घडतात. परंतू हे सामान्य आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Top trending, Viral news