मराठी बातम्या /बातम्या /Viral /विमानाचं इंजिन फेल, आजीचा आक्रोश; 18 वर्षांच्या पायलटनं हायवेजवळ केलं इमर्जन्सी लँडिंग

विमानाचं इंजिन फेल, आजीचा आक्रोश; 18 वर्षांच्या पायलटनं हायवेजवळ केलं इमर्जन्सी लँडिंग

विमान

विमान

आकाशात विमान उडवणं सर्वांत जोखमीचं काम मानलं जातं. अशातच एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर विमानातील सर्व प्रवाश्यांच्या जीवाची जबाबदारी पायलटवर येते.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 28 जानेवारी : आकाशात विमान उडवणं सर्वांत जोखमीचं काम मानलं जातं. अशातच एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर विमानातील सर्व प्रवाश्यांच्या जीवाची जबाबदारी पायलटवर येते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पायलटच्या अनुभवाचा कस लागतो. काही पायलट सुरक्षित लँडिंग करण्यात यशस्वी होतात तर काहीवेळा अपघात होतो. मात्र, विमान उडवणारा पायलट केवळ 18 वर्षांचा मुलगा असेल तर? त्याच्याकडून सुरक्षित लँडिंगची अपेक्षा करणं योग्य ठरणार नाही. पण, कॅलिफोर्नियातील एका 18 वर्षांच्या पायलटनं आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित लँडिंग करून दाखवलं आहे. ब्रॉक पीटर्स असं या पायलटच नाव आहे. तो एका सिंगल इंजिनच्या विमानात आपल्या कुटुंबाला कॅलिफोर्नियातील रिव्हरसाइड म्युनिसिपल एअरपोर्टवर नाश्ता करण्यासाठी घेऊन जात होता. कॅलिफोर्नियाला उड्डाण करत असताना त्याला एका भीतीदायक परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला सोमवारी (2 जानेवारी) कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो नॅशनल फॉरेस्टमध्ये डबल लेन हायवेजवळ इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  ब्रॉक पीटर्सला चार महिन्यांपूर्वी पायलटचा परवाना मिळाला आहे. सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, पीटर्स आपली आजी आणि दोन चुलत भावंडांसोबत अॅपल व्हॅलीपासून ते रिव्हरसाइड विमानतळापर्यंत उड्डाण करत होता. मात्र, अचानक त्याला आजीच्या रडण्याचा आवाज आला. म्हणून त्यानं विमान खाली उतरवण्याचा निर्णय घेतला. पीटर्सनं केसीबीएस/केसीओएलला सांगितलं, "मी पाठीमागे बसलेल्या माझ्या आजीला रडताना ऐकू शकत होतो. तिच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. म्हणून विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी काय करावे लागेल यावर लक्ष केंद्रित केलं. विमान खाली उतरवून प्रत्येकजण ठीक आहे याची खात्री करणं गरजेचं होतं."

  हेही वाचा -  मामला प्यार का है! गुपचूप लग्न करत होता बॉयफ्रेंड, तरुणीने मंडप गाठून शिकवली अद्दल

  "मी आणि माझं कुटुंब एका खिंडीवरून जात होतो आणि मला 'बूम' आवाज ऐकू आला. मग मी माझ्या विमानाची सर्व इंजिन पॉवर गमावली. अशातच आजीच्या रडण्याचा आवाज आला. इंजिनला पॉवर नसल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करणं सर्वात सुरक्षित गोष्ट ठरू शकते, हे मला माहिती होतं," असं पीटर्सनं सीबीएस लॉस एंजेलिसला सांगितलं.

  " isDesktop="true" id="809184" >

  केसीबीएस/केसीओएलला मिळालेल्या माहितीनुसार, त्यानं कॅजोन पास समोरच्या रस्त्यावर विमान उतरवलं. आपात्कालीन परिस्थितीचा सामना करूनही पीटर्स पुढील आठवड्यात लगेच विमान उडवण्यास सुरुवात करणार आहे.

  घटनेची होणार चौकशी

  एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) या घटनेची चौकशी करणार आहेत. फेडरल एव्हिएशन असोसिएशननं (एफएए) एका निवेदनात म्हटलं आहे की, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजताच्या सुमारास एल कॅजोन बुलेव्हार्डवर आपत्कालीन लँडिंग झालं. या घटनेत विमानात असलेल्या चार व्यक्तींपैकी कोणीही जखमी झालेलं नाही.

  जेव्हा पीटर्सच्या विमानाचं इंजिन निकामी झालं तेव्हा तो खिंडीवरून जात होता. भूप्रदेशामुळे तो जवळच्या विमानतळावरील टॉवरला सूचित करू शकला नाही. असा परिस्थितीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करणं ही सर्वांत सुरक्षित गोष्ट आहे, हे त्याच्या लक्षात आलं. आपण लँडिंग करत आहोत याची त्याला पूर्ण कल्पना होती.

  पीटर्सनं सीबीएस लॉस एंजेलिसला सांगितले, "देवाची कृपा म्हणून लँडिंग करताना कशाशीही टक्कर झाली नाही. मी जसं ठरवलं होतं तसचं झालं, याचा मला आनंद आहे."

  First published:

  Tags: Airplane, Airport, Top trending, Viral, Youtube