नवी दिल्ली. 28 जानेवारी : तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. प्रेमामध्ये दोघेही एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र कधी कधी याच प्रेमात मोठा धोकाही मिळतो. त्यामुळे प्रेमाविषयीच्या अनेक चांगल्या घटनेसोबतच काही वाईट, दुःखद घटनाही समोर येत असतात. अशातच प्रेमात एक तरुणीला धोका मिळल्याची घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला धोक्या देण्याचा प्रयत्न करुन दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा विचार केला होता. मात्र ऐन वेळी गर्लफ्रेंडने त्याला चांगलाच धडा शिकवला. ही घटना उत्तर प्रदेशातील असून सध्या याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नक्की हे प्रकरण काय आहे याविषयी पाहुया. हेही वाचा - आधुनिक श्रावणबाळ! आईला दाखवलं सिंगापूर, Emotional Post ने जिंकलं मन उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. डॅनी नावाटा तरुण प्रेमविवाह करून गेल्या 5 वर्षांपासून त्या मुलीसोबत राहत होता. काही महिन्यांपूर्वी हा तरुण गुन्नौर येथील आपल्या घरी आला आणि गुन्नौर येथीलच नगर पंचायतीत कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करू लागला. दरम्यान, या तरुणाने आपली प्रेयसी असल्याचे भासवून अलीगढ येथील एका तरुणीसोबत लग्न निश्चित केले होते. गेल्या गुरूवारी हा तरुण लग्नाला निघण्याच्या तयारीत होता. तरुणाचा हळदी समारंभ पार पडला, घरात लग्नाचे वातावरण होते. त्यामुळे तरुणाच्या मैत्रिणीने पोलिसांसह तरुणाच्या घरी येण्याची धमकी दिली. प्रेयसीने तरुणाच्या नातेवाईकांना आणि घरात जमलेल्या पाहुण्यांना या तरुणासोबत 5 वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाची माहिती दिली.
मुलीने तरुणाच्या घरच्यांना त्यांच्या लग्नाचा पुरावाही दाखवला. त्यामुळे लग्न समारंभात चांगलाच गोंधळ झाला. पोलिसांनी तरुणाला पकडून नेलं. मग लग्नासाठी थांबलेल्या मुलीचं लग्न त्याच्या भावासोबत लावण्यात आलं. या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली. गुन्नौर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक एनके सिंह यांनी सांगितले की, गुन्नौरमध्ये राहणाऱ्या तरुणाची मैत्रीण पोलिस ठाण्यात आली आणि तिने तरुणासोबत लग्न केल्याची माहिती दिली. त्यानंतर तरुणाला फोन करून माहिती देण्यात आली. तरुण आणि तरुणीमध्ये करार झाला आहे. प्रेयसी तरुणाला सोबत घेऊन दिल्लीला गेली आहे. तरुणाच्या जागी त्याच्या धाकट्या भावाने लग्नासाठी मिरवणूक काढली आहे.