भोपाळ, 11 जानेवारी : शिक्षक जे आपल्या विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देतात. चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात. पण अशाच एका शिक्षिकेने मात्र संतापजनक कृत्य केलं आहे (Female professor high voltage drama). एका महिला प्रोफेसरने आपल्या कारला हलकासा स्क्रॅच पडला म्हणून एका गरीब फळविक्रेत्याच्या (Fruits seller video) पोटावर लाथ मारली आहे. तिचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला (Female professor fruits scattered on road). रस्त्यावर हायवोल्टेज ड्रामा करणाऱ्या महिला प्रोफेरसरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Madhya pradesh bhopal Female professor video). ही महिला मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एका युनिव्हर्सिटीत प्राध्यापिका असल्याची माहिती मिळते आहे. तिच्या गाडीला एका फळविक्रेत्याच्या हातगाडीमुळे हलकासा स्क्रॅच आला. त्यामुळे ती खवळली आणि तिने रस्त्यातच धिंगाणा घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - VIDEO - ठुमके सोडून महिलांचं एकमेकींना ‘दे दणादण’; भांडण सोडवणाऱ्यालाही तुडवलं माहितीनुसार एक फळविक्रेता हातगाडीवर फळ विकत होता. हातगाडी चालवत नेताना चुकून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला तिची टक्कर लागली. ही कार महिला प्राध्यापिकाची होती. कारला हातगाडी धडकल्याचं कळताच तिचा संताप अनावर झाला. ती रागात बाहेर आली आणि फळविक्रेत्यावर तुटून पडली. त्याला ती काय काय नाही बोलली. इतकंच नव्हे तर त्याच्या गाडीवरील फळंही रस्त्यावर फेकून दिली.
मध्य प्रदेशमध्ये महिला प्रोफेसरचा रस्त्यावर धिंगाणा; हातगाडीमुळे गाडीला स्क्रॅच गेल्याने फळविक्रेत्याची फळं रस्त्यावर फेकली. pic.twitter.com/dqw3lrEnMt
— News18Lokmat (@News18lokmat) January 11, 2022
व्हिडीओत पाहू शकता ही लेडी प्रोफेसर फळविक्रेत्यावर राग काढताना दिसते आहे. रागात तिने फळविक्रेत्याच्या गाडीवरील सर्व फळं रस्त्यावर फेकताना दिसते आहे. फळविक्रेता तिला मॅडम असं करू नका म्हणून विनवणी करतो आहे. इतकंच नव्हे तर तो तिला नुकसानीची भरपाईही देतो आहे. तिला पैसे देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण महिला त्याचं काहीच ऐकत नाही. उलट ती एवढ्यावरच थांबली नाही. पुढे तर तिने हद्दच केली.
मध्य प्रदेशमध्ये महिला प्रोफेसरचं संतापजनक कृत्य; गाडीला स्क्रॅच गेल्याने फळविक्रेत्याची हातगाडीच रस्त्यावर उलटी केली. pic.twitter.com/jr5J5En0tq
— News18Lokmat (@News18lokmat) January 11, 2022
सुरुवातीला एकेएक फळ रस्त्यावर फेकणाऱ्या या मॅडमनी हातगाडीच रस्त्यावर उलटी केली आणि त्यानंतर ती आपल्या कारमध्ये जाऊन बसली. त्यावेळी फळविक्रेताही भडकला. आधी प्राध्यापिकेला विनवण्या करणारा विक्रेता संतप्त झाला. महिला गाडीत बसताच तुम्ही हे बरोबर केलं नाही. कुणाला बोलवायचं आहे, त्यांना बोलवा. असं तो म्हणताना दिसतो. हे वाचा - लग्नात वाजलेल्या गाण्यामुळे चढला नवरदेवाचा पारा; नवरीबाईला मंडपातच घटस्फोट दिला महिला ज्या गाडीत बसली त्या गाडीच्या मागे सेज युनिव्हर्सिटी लिहिल्याचं दिसतं आहे. ही भोपाळमधील एक नामांकित प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. ही घटना अयोध्यातील बायपास परिसरातील असल्याचं सांगितलं जातं आहे.