वॉशिंग्टन, 10 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. प्रत्येक जण आता व्हॅलेंटाईड डेची प्रतीक्षा करत आहेत. पण या प्रेमाच्या दिवसानंतर पृथ्वीवर मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या दिशेनं मोठं संकट येत आहे. या संकटाबाबत तज्ज्ञांनी अलर्ट केलं आहे. नुकतंच तुर्की-सीरिया भूकंपाने हादरलं आहे, त्यात आता धरतीवर येणार असलेल्या या नव्या संकटामुळे सर्वांना धडकी भरली आहे. हे संकट नेमकं आहे तरी काय पाहुयात.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या या संकटाबाबत सावध केलं आहे. हे संकट दुसरं तिसरं काही नाही तर एस्टोरॉईड म्हणजे एक मोठा लघुग्रह आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून पृथ्वीच्या अगदी जवळ येऊ शकतो. पृथ्वीला तो धडकण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, नासा बऱ्याच कालावधीपासून या लघुग्रहावर लक्ष ठेवून येतो. या लघुग्रहाला 199145 (2005 YY128) असं नाव देण्यात आलं आहे. हा दगड सुमारे 1 किलोमीटर रुंद आहे. या लघुग्रहाचा आकार 1870 ते 4265 फूट असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
हे वाचा - पृथ्वीवर उभं राहून पृथ्वीला फिरताना कधी पाहिलंय; पाहा अद्भुत VIDEO
पुढील आठवड्यापर्यंत हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत धडकू शकतो, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत तो पृथ्वीच्या 4.5 दशलक्ष किलोमीटरच्या जवळ येईल, पण तो पृथ्वीच्या कक्षेत टक्कर देईल की नाही, याची नासाला खात्री नाही.
जानेवारी महिन्यातच एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला होता. 2023 BU हा लघुग्रह 21 जानेवारी रोजी आढळला आणि 27 जानेवारी रोजी सकाळी 12.30 वाजता दक्षिण अमेरिकेतून गेला. हा लघुग्रह पृथ्वीपासून 3500 किलोमीटर अंतरावरून बाहेर आला. याचा अर्थ तो जगातील दूरसंचार उपग्रहांपेक्षा 10 पट जवळ आला होता. यापासून कोणतीही हानी झाली नाही कारण त्याचा आकार 11 फूट ते 28 फूट इतकाच होता आणि 82 फुटांपेक्षा लहान दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळतात.
हे वाचा - OMG! सूर्यावर दिसला चक्क फिरता साप: VIDEO पाहून शास्त्रज्ञही झाले हैराण
दरम्यान याधाही पृथ्वीवर असे लघुग्रह आदळले होते. 1908 मध्ये रशियातील तुंगस्का परिसरात 60 मीटर व्यासाची अशनी पृथ्वीवर आदळली होती. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको युकातान प्रदेशात 10किमी व्यासाची अशनी आदळल्यामुळे डायनासॅार नष्ट झाले होते. 52 हजार वर्षांपूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण भारतात लोणार येथे आदळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.