मुंबई, 16 फेब्रुवारी: सोशल मीडिया (Social Media Viral) हे मित्र, नातेवाईकांशी कनेक्ट राहण्याचं प्रभावी माध्यम आहे. अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ, फोटो पाहतो. यातून नवे ट्रेंड (Social Media Trend) पाहायला मिळतात. केवळ चर्चेत राहणं, प्रसिद्धी मिळवणं हा यामागचा प्रमुख उद्देश असतो. काही विचित्र ट्रेंड आल्यावर हे नेमकं कोण आणि कशासाठी करतं, असे नानाविध प्रश्न उपस्थित केले जातात. सध्या अशीच एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. नोटेवर ‘राशी बेवफा है’ (Rashi Bewafa Hai) असं लिहून त्याचा मार्केटमध्ये प्रसार करताना दिसत आहेत. तुम्हीही सोशल मीडियावर ‘राशी बेवफा है’ लिहिलेली नोट पाहिली असेल. ही नोट एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती पडल्यावर किंवा पाहिल्यावर या वाक्याचा अर्थ काय आणि हे कोणी लिहिलंय, असे प्रश्न त्यांना पडत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल व्हावं, त्यातून प्रसिद्धी मिळावी, यासाठी काही लोक वेगवेगळे डावपेच वापरतात. यासाठी काही विचित्र प्रयोगही केले जातात. सध्या असाच काहीसा ट्रेंड जोरदार चर्चेत आहे.‘राशी बेवफा है’ हा ट्रेंड सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही वर्षांपूर्वी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ (Sonam Gupta Bewafa Hai) असं नोटेवर लिहून ते व्हायरल करण्यात येत होतं. अशाच प्रकारे आता ‘राशी..’ चा ट्रेंड व्हायरल होत आहे.
Ye Rashi Kon Hai , Sonam ki behen hai kya ? pic.twitter.com/3FnPjjEdAI
— The Detective (@the_detective1) February 14, 2022
हे वाचा- 2 मित्रांच्या बायका पडल्या एकमेकींच्या प्रेमात; मग उचललं हे मोठं पाऊल पण… या अनुषंगाने लोक इंटरनेटवर विचित्र प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावर एका युजरनं लिहिलं आहे की, ‘ही राशी कोण आहे, सोनमची बहीण आहे का?’ दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे की, ‘ही राशी कोण आहे? कोण आहे ही राशी? प्रत्येक नोटेवर ‘राशी बेवफा है’ असं लिहिलं आहे. मी सोनमचं नाव ऐकलं आहे, आता राशीपण का?’ एका तिसऱ्या युजरनं यावर फार मजेशीर कमेंट केली आहे. हा युजर म्हणतो की, ‘राशी सोनम गुप्ताची छोटी चुलत बहिण आहे का? ही राशी नेमकी कोण आहे?’
Ye Rashi Kon Hai
— Ravi Verma (@verma7050) February 14, 2022
Who is Rashi . In every note written as Rashi bewafa hai . I heard the name of Sonam this time Rashi . pic.twitter.com/uMuNeeeYCd
काही वर्षांपूर्वी सोनम गुप्ता बेवफा है असं नोटेवर लिहित त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला होता. हा ट्रेंड इतका व्हायरल झाला की ही सोनम गुप्ता नेमकी कोण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता. ‘रसोडे में कौन था’ हे वाक्य देखील जोरदार ट्रेंडमध्ये होतं. ‘साथ निभाना साथिया’ या सीरियलमधला हा संवाद असल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं. ‘सोनम गुप्ता बेवफा है’च्या ट्रेंड पाठोपाठ आता अजून एक ट्रेंड आला आहे. यात काही लोक नोटेवर ‘राशी बेवफा है’ असं लिहिताना दिसत आहेत. हे दुसरं तिसरं काही नसून, एक जुनाच पण नव्याने आलेला ट्रेंड आहे.