नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : प्रेमात पडलेल्या माणसाला चूक आणि बरोबर यातला फरक कळणंही बंद होतं, असं म्हटलं जातं. जेव्हा एखाद्याला प्रेम होतं, तेव्हा तो व्यक्ती जगाकडे दुर्लक्ष करून फक्त त्या एका व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो. सोबत प्रेमाला वयाचं बंधनही नसतं. प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. नुकतंच सोशल मीडियावर दोन महिलांनीही आपली अशीच लव्ह स्टोरी (Weird Love Story) शेअर केली आहे. एकमेकींना भेटण्याच्या आधीच त्या दोघीही विवाहित होत्या. मात्र प्रेमात पडल्यानंतर दोघींनीह आपल्या पतीला घटस्फोट दिला. आता त्या आपल्यासाठी आणखी एक पार्टनर शोधत आहेत.
लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या बाजूला बसली होती नववधू,अचानक कोसळली स्टेजवर अन्…
टोरी आणि सोलने आपली स्टोरी Consenting Adults नावाच्या पॉडकास्टवर शेअर केली. त्यांनी सांगितलं की दोघी पहिल्यांदा एका सोशल क्लबमध्ये भेटल्या होत्या. त्यावेळी दोघीही आपल्या आपल्या पतीसोबत इथे आल्या होत्या. मात्र तेव्हा त्यांच्या मनात एकमेकींबद्दल तशी काही भावना नव्हती. दोघींचे पती मित्र होते. त्यामुळे या दोघींचीही मैत्री झाली. हळूहळू दोघींच्याही मनात एकमेकींसाठी फिलिंग येऊ लागल्या. परिणामी दोघीही भरपूर वेळ एकमेकींसोबत घालवू लागल्या. अखेर त्यांनी मान्य केलं, की त्यांचं एकमेकींवर प्रेम आहे. आपलं नातं मान्य केल्यानंतर टोरी आणि सोलने आपल्या पतींना घटस्फोट दिला. यानंतर दोघी सोबत राहू लागल्या. दोघींचंही एकमेकींवर खूप प्रेम आहे. मात्र या रोमँटिक नात्याला अधिक खास करण्यासाठी आता त्यांना एक पुरुष हवा आहे. टोरीने सांगितलं की त्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत, जो दोघींसोबत राहील. त्यांचं नातं अतिशय गुंतागुंतीचं आहे. आधी दोघींनाही वाटलं की त्या लेसबियन (Lesbian) आहेत. या कारणामुळे त्यांनी पतीला घटस्फोट दिला. मात्र सोबत राहिल्यानंतर त्यांना जाणवलं की दोघीही पुरुषांकडे आकर्षित होतात. याच कारणामुळे आता त्या पार्टनर शोधत आहेत.
प्रेम खरंच आंधळं असतं! 3 फुटांच्या महिलेचं 13 वर्षांनी लहान तरुणावर जडलं प्रेम
आपल्या नवीन पार्टनरच्या शोधात दोघी अनेक कपल बेस्ड इव्हेंट्समध्ये जातात. तिथे आपल्याला हवा त्या व्यक्तीचा शोध घेतात. लोकांना या दोघींची स्टोरी अतिशय अजब वाटते. तर अनेकांनी दोघींना आपल्या कॉन्टॅक्ट करण्यासही सांगितलं. लोकांनी कितीही टीका केली तर दोघींना काहीच फरक पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या एकमेकांसोबत खूश आहेत आणि आता एक पार्टनर शोधत आहेत.