जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कसं शक्य आहे? निर्जीव बाहुल्याने केलं प्रेग्नंट; दुसऱ्यांदा गरोदर असल्याचा महिलेचा अजब दावा

कसं शक्य आहे? निर्जीव बाहुल्याने केलं प्रेग्नंट; दुसऱ्यांदा गरोदर असल्याचा महिलेचा अजब दावा

(फोटो: @choquei/Twitter)

(फोटो: @choquei/Twitter)

या महिलेने एका निर्जीव बाहुल्याशी लग्न केलं असून, ती दुसऱ्यांदा त्या बाहुल्याच्या बाळाची आई होणार आहे, असा दावा ती करते.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    ब्राझिलिया, 13 एप्रिल : लहान मुलांना बाहुल्यांशी खेळायला आवडतं. या बाहुल्या जिवंत माणसांप्रमाणे आहेत असा विचार करून लहान मुलं त्यांच्याशी बोलू लागतात; मात्र काही जणांमध्ये मोठेपणीदेखील ही सवय कायम राहिते आणि ते निर्जीव वस्तू सजीव आहेत असं समजू लागतात. ब्राझीलमधली एक महिलाही असाच विचार करते. ही महिला अशा माणसांमध्ये एक पाऊल पुढे आहे. या महिलेने एका निर्जीव बाहुल्याशी लग्न केलं असून, ती दुसऱ्यांदा त्या बाहुल्याच्या बाळाची आई होणार आहे, असा दावा ती करते. `डेली स्टार` या न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, ब्राझीलमधली 37 वर्षांची एक महिला तिचा विचित्र दावा आणि रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहे. तिच्या या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या महिलेने प्रेग्नंट असल्याचा दावा केला आहे. या महिलेचा पती म्हणजे कापडापासून बनवलेला एक बाहुला आहे. अर्थातच तो बाहुला निर्जीव आहे; मात्र या महिलेच्या दृष्टीने तो सजीव आहे. मेरिव्हॉन रोचा मोरेस ही महिला तिच्या विचित्र दाव्यामुळे सध्या चर्चेत आहे. आश्चर्य! गेली 15 वर्षे प्रेग्नंट आहे महिला, एक-दोन नव्हे तर तब्बल 12 मुलं; कारणही विचित्र मार्सेलो नावाचा हा बाहुला या महिलेच्या आईने तिच्यासाठी बनवला होता. ही महिला त्याच्या एवढी प्रेमात पडली की, दोन वर्षांपूर्वी तिचं त्या बाहुल्याशी लग्न झालं. या विवाह सोहळ्यात महिलेच्या कुटुंबातले सदस्यही सहभागी झाले होते. गेल्या वर्षी या महिलेने आपण मार्सेलोच्या बाळाची आई होणार असल्याचं सांगून सर्वांना आश्चर्यचकित केलं. मे 2021मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजेदेखील एक कापडी बाहुला असून, तिने त्याचं नाव मार्सेलिनो असं ठेवलं. या वेळी आपल्याला मुलगी होईल, अशी खात्री वाटत असल्याचं या महिलेनं सांगितलं. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की मेरिव्हॉनने तिच्या निर्जीव बाहुला असलेल्या पतीवर विश्वासघाताचा आरोप केला होता. `माझ्या पतीचं अफेअर सुरू होतं. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता,` असं तिनं सांगितलं. हळूहळू त्यांच्यातलं नातं सुधारलं आणि ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिली, असा दावा तिने केला. `माझ्या पतीची वागणूक आता सुधारली असून, तो माझी खूप काळजी घेतो,` असं या महिलेनं सांगितलं. एका वृत्तानुसार, मेरिव्हॉननं टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तिने तिच्या पॉझिटिव्ह प्रेग्नन्सीचा पुरावा दाखवला होता. एका ट्विटर अकाउंटवरच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिने तिच्या निर्जीव मुलाचा फोटो जागोजागी लावला होता आणि त्याचं अपहरण झाल्याचं त्यात म्हटलं होतं. काहीही! थुंकी, कानाचा मळ आणि नको तेच…; शरीरातील घाण विकून लाखो रुपयांची कमाई या महिलेने केलेला प्रेग्नन्सीचा विचित्र दावा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. निर्जीव बाहुल्यामुळे गर्भधारणा कशी होऊ शकते, असा प्रश्नदेखील सर्वांना पडला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात