Home /News /viral /

नशीब म्हणायचं की चमत्कार? डोक्यावरून ट्रॅक्टर जाऊनही वाचला जीव, पाहा Shocking VIDEO

नशीब म्हणायचं की चमत्कार? डोक्यावरून ट्रॅक्टर जाऊनही वाचला जीव, पाहा Shocking VIDEO

डोक्यावरून (Head) ट्रॅक्टरचं अख्खं चाक (Tyre of tractor) जाऊनदेखील एक व्यक्ती सहीसलामत बचावल्याची (Survived) घटना नुकतीच समोर आली आहे.

    अहमदाबाद, 16 सप्टेंबर : कधी कधी अशा घटना घडतात की त्याची वैज्ञानिक कारणं शोधणंही आव्हानात्मक असतं. डोक्यावरून (Head) ट्रॅक्टरचं अख्खं चाक (Tyre of tractor) जाऊनदेखील एक व्यक्ती सहीसलामत बचावल्याची (Survived) घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. असा झाला अपघात ही घटना आहे गुजरातमधल्या दाहोदची. पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे पावसामुळे साचलेलं पाणी अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत एक दुचाकीस्वार एक महिला आणि छोट्या बाळाला घेऊन दुचाकीवरून चालला होता. त्याच्या डाव्या बाजूने एक ट्रॅक्टर पास होत होता, तर उजव्या बाजूला पावसाचं पाणी साचलं होतं. या दोन्हीच्या मधून बाईक नेत असताना अचानक गाडी स्लिप झाली. तिघेही थेट ट्रॅक्टरखाली गाडी घसरल्यानंतर तिघेही ट्रॅक्टरखाली पडले. हा अपघात झाला तेव्हा ट्रॅक्टरचा पुढचा भाग पास झाला होता. त्यामुळे मागे काय घडतंय, याची ट्रॅक्टरचालकाला काहीच कल्पना नव्हती. ट्रॅक्टरच्या मागच्या चाकापाशी आल्यानंतर बाईक घसरली आणि बाईकचालक, महिला आणि लहान बाळ तिघेही ट्रॅक्टरखाली पडले. मात्र त्याचवेळी पडता पडता ही गाडी फिरल्यामुळे महिला आणि बाळ हे ट्रॅक्टरपासून काहीसे दूर ओढले गेले. त्यांच्या अंगावर ट्रॅक्टरचे चाक आले नाही. सर्वात पुढे आणि ट्रॅक्टरच्या जवळ असणाऱ्या दुचाकी चालकाच्या मात्र डोक्यावरून आणि मानेवरून ट्रॅक्टरचं मागचं चाक गेलं. हा व्हिडिओ पाहत असताना जेव्हा ट्रॅक्टरचं चाक बाईकसस्वाराच्या डोक्यावरून जातं, त्यावेळी या घटनेत त्याचा मृत्यू निश्चित झाला असावा, असंच सुरुवातीला वाटतं. मात्र हा चमत्कार म्हणायचा की नशीब, असा प्रश्न त्यानंतरची दृश्यं पाहिल्यावर पडतो. हे वाचा - झुंज यशस्वी! तब्बल 130 दिवसांचा कोरोना, रुग्ण सांगतोय अनुभव डोक्यावरून बाईकचं चाक जाऊनदेखील हा दुचाकीस्वार उठून उभा राहिला आणि त्यानंतर महिला ट्रॅक्टरचालकाला जाब विचारण्यासाठी पुढं आल्याचं दिसलं. अर्थात, या दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलं होतं. मात्र ट्रॅक्टरखाली पडल्या पडल्या हे हेल्मेट त्याच्या डोक्यातून निघाल्याचंही व्हिडिओत दिसतं. त्यामुळे हेल्मेट नसतानाही डोक्यावरून ट्रॅक्टरचं चाक जाऊन हा माणूस कसा वाचला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bike accident, Gujrat technological university, Shocking viral video

    पुढील बातम्या