मुंबई, 22 जुलै : साप खूप धोकादायक प्राणी आहे. त्याच्या एका दंशाने व्यक्तीचे प्राण देखील जाऊ शकतात. त्यामुळे लोक सापापासून लांबच पळतात. साप लांब दिसला तरी लोक तेथून पळ काढतात. पण एका व्यक्तीनं असं धाडस केलं की ज्याबद्दल जाणून सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्यक्तीने रागाच्या भरात चक्क सापाचा फणा चावला. आता ऐवढं जाणून घेतल्यावर नक्की काय घडलं यासाठी तुमच्या मनात उत्सुकता नक्कीच वाढली असेल. चला या प्रकाराबद्दल सविस्तर जाणून घेऊ. हे प्रकरण झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील आ. येथे एका सापाने एका तरुणाला चावा घेतला म्हणून त्या तरुणाने सापाचा फणा चावला. ज्या ज्या लोकांनी या प्रकाराबद्दल ऐकलं आहे. ते सर्वच थक्क झाले आहेत. विषारी आणि धोकादायक सापांचे आकर्षक रुप कधी पाहिलंय? पाहा जगातील सुंदर सापांचे PHOTO या तरुणाचे नाव भुवन आहे. या तरुणासोबत घडलेली ही घटना जेव्हा भुवनच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा ते घाबरले आणि त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना केओंझर (ओडिशा) येथे त्याला रेफर करण्यात आले. येथे डॉक्टरांनी भुवनवर चांगले उपचार करून त्याचे प्राण वाचवले आणि आता तो पूर्वीसारखाच निरोगी आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? भुवनच्या नातेवाईकांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी शेजारच्या घरात एक साप घुसला होता, ज्याला भुवन हाकलून देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, साप बाहेर येताच त्याने भुवनच्या उजव्या हाताला चावा घेतला. यानंतर भुवनने सापाला पकडून सुमारे 15 सेंटीमीटर पसरलेल्या फणा चावला. आधी सर्पदंश आणि नंतर त्याचा फणा खाल्ल्याची बातमी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.