मुंबई 28 ऑगस्ट : आशिया चषक 2022 ला सुरुवात झाली आहे. रविवारी म्हणजे 28 ऑगस्ट 2022 ला भारत आणि पाकिस्तानमधील रोमांचक मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानमधली मॅच म्हटली, तर सगळेच लोक खूप उत्सूक असतात आणि हा सामना कोणालाच चूकवायचा नसतो. क्रिकेटप्रेमींमध्ये तर अगदी आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून ही मॅच कधी पाहायला मिळतेय अशी उत्सुक्ता लागून राहिली होती. तसेच सोशल मीडियावर देखील लोकांनी या मॅच संदर्भात मीम्स शेअर करायला सुरूवात केली आहे. त्यात भारतीय बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट एग्रीगेटर आणि फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने देखील शनिवारी, एक ट्वीट शेअर केलं जे #burgerpizze म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं आहे. झोमॅटोच्या या ट्वीटने ओल्ड ट्रॅफर्ड येथे 2019 च्या विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवाची आठवण करून दिली. हे वाचा : Ind vs Pak: ‘स्पेशल’ सामन्यासाठी विराटला ‘स्पेशल’ शुभेच्छा! आरसीबीच्या या खेळाडूंनी शेअर केला खास व्हिडीओ खरंतर मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषक गटातील लढतीत भारताने ८९ धावांनी विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या पराभवानंतर, अशी देखील माहिती समोर आली होती की, मॅचपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ पिझ्झा-बर्गर खात होता आणि याच कारणामुळे पाकिस्तान ती मॅच हरल्याचं देखील बोललं जातं.
aaj raat ke kya plan? #burgerpizze https://t.co/GziCjwEpFi
— zomato (@zomato) August 27, 2022
या संदर्भात एका चाहत्याने आरोप केला होता की, “मला नुकतेच कळले की पाकिस्तानी खेळाडू काल रात्री पिझ्झा आणि बर्गर खात होते. पाकिस्तानी खेळाडूंनी क्रिकेटऐवजी कुस्तीला जावे. आम्हाला त्यांच्याकडून खूप आशा होत्या, पणे ते पिझ्झा आणि बर्गर खात बसले." हे वाचा : IND vs PAK Asia Cup 2022 : पंतऐवजी कार्तिक, टीम इंडियाने टाळली विराटने केलेली चूक, रोहितने सांगितली Inside Story या गोष्टीचा संदर्भ घेत, Zomato ने पाकिस्तान क्रिकेटची एक पोस्ट रिट्विट केली, जिथे खेळाडू त्यांचे मोबाईल तपासताना दिसतात, आणि “आज रात्रीचा काय प्लान? #burgerpizze.” असं ट्विट केलं आहे. ज्यानंतर हा हॅशटॅग व्हायरल होऊ लागला. ज्यावर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

)







