जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK Asia Cup 2022 : पंतऐवजी कार्तिक, टीम इंडियाने टाळली विराटने केलेली चूक, रोहितने सांगितली Inside Story

IND vs PAK Asia Cup 2022 : पंतऐवजी कार्तिक, टीम इंडियाने टाळली विराटने केलेली चूक, रोहितने सांगितली Inside Story

Rohit Sharma Rishabh Pant

Rohit Sharma Rishabh Pant

आशिया कपमध्ये (Asia Cup) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला महामुकाबला सुरू झाला आहे, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे, पण टॉसवेळी रोहितने केलेल्या घोषणेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दुबई, 28 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला महामुकाबला सुरू झाला आहे, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे, पण टॉसवेळी रोहितने केलेल्या घोषणेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने ऋषभ पंतला (Rishabh Pant) बाहेर करून दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) विकेटकीपर म्हणून संधी दिली आहे. रोहित शर्मानेच टॉसवेळी याचं कारण सांगितलं. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यातल्या एकालाच संधी मिळणार होती, हा निर्णय आमच्यासाठी कठीण होता, पण दुर्दैवाने ऋषभ पंतला बाहेर बसावं लागत आहे, असं रोहित शर्मा टॉसवेळी म्हणाला. विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचं टीम इंडियात पुनरागमन झाल्यामुळे टीमच्या संतुलनामध्ये फरक पडला आहे. मागचे काही महिने राहुल दुखापतीमुळे तर विराट फॉर्ममध्ये नसल्यामुळे विश्रांती घेत होता. या दोघांऐवजी इशान किशन, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी टीम इंडियासाठी ओपनिंगला बॅटिंग केली. हे तिन्ही खेळाडू विराट-राहुलच्या गैरहजेरीत वरच्या क्रमांकावर खेळल्यामुळे टीम इंडियाला खालच्या क्रमांकावर बॉलिंग करू शकणाऱ्या बॅट्समनचा पर्याय उपलब्ध होता. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणीही बॉलिंग करत नसल्यामुळे ऋषभ पंतला टीममध्ये संधी दिली असती तर पुन्हा एकदा टीम इंडियाला 5 बॉलर घेऊनच मैदानात उतरावं लागू शकलं असतं. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T2o World Cup) कर्णधार असलेल्या विराट कोहलीने 5 बॉलर घेऊन खेळण्याची चूक केली, ज्याचा मोठ्या प्रमाणावर टीम इंडियाला फटका बसला. टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. रोहित शर्माने मात्र ऋषभ पंतला बाहेर ठेवून टीममध्ये 6 बॉलर ठेवण्याचा पर्याय निवडला आहे, त्यामुळे एखाद्या बॉलरची जरी धुलाई झाली तरीही रोहितपुढे बॉलिंगचा सहावा पर्याय उपलब्ध आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियामध्ये भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे बॉलिंगचे 6 पर्याय आहेत. भारतीय टीम रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग पाकिस्तानची टीम बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिकार अहमद, खुशदील शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाझ, नसीम शाह, हारिस राऊफ, शाहनवाझ दहानी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात