जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कुत्रा पाळणं महिलेला पडलं महागात... दुर्गंध येतोय म्हणून घरात पाहिलं तेव्हा पोलिसांना ही बसला धक्का

कुत्रा पाळणं महिलेला पडलं महागात... दुर्गंध येतोय म्हणून घरात पाहिलं तेव्हा पोलिसांना ही बसला धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपले प्राण देऊन कुत्र्याने आपल्या मालकाचे प्राण वाचवले असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये कुत्र्यामुळे त्याची मालकीण संकटात सापडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 09 जानेवारी : प्राणी प्रेमींची जगात कमी नाही. म्हणून तर तुम्हाला आजूबाजूला असे अनेक लोक दिसतील, जे प्राण्यांना आपल्या घरी सांभाळतात. या प्राण्यांमध्ये मांजर, कुत्रा, गाय, शेळ्या, मेंढ्यां यांच्यासारख्या अनेक प्राण्यांचा समावेश आहे. पण शहरी भागाता बहुतांश लोक हे कुत्रे सांभाळतात. कुत्रा हा फार हुशार प्राणी आहे, असं म्हणतात आणि त्याला माणसाप्रमाणेच भावना असल्याचं देखील म्हटलं जातं. तो आपल्या मालकावर जिवापार प्रेम करतं आणि वेळ प्रसंगी आपले प्राण देऊन कुत्र्याने आपल्या मालकाचे प्राण वाचवले असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये कुत्र्यामुळे त्याची मालकीण संकटात सापडली आहे. हे ही पाहा : एक फोनकॉल असा ही, फोनवर बोलत राहिली महिला आणि स्वत:लाच घातला गंडा हो हे खरं आहे, मालकाला कुत्र्याला पाळणं जिवावर बेतलं आहे. वास्तविक, ही घटना अर्जेंटिनाच्या सांता रोसा शहरातील आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचे नाव आना इनेस डी मारोटे आहे. महिलेचे घर शहराच्या विमानतळाच्या जवळच आहे. मधल्या काळात ही महिला अनेक लोकांना दिसली नाही आणि ती घरातून बाहेर देखील पडली नाही. आठवडाभरानंतर लोकांना संशय आला, तेव्हाच तिच्या घरातून दुर्गंध ही बाहेर येऊ लागला. काही वेळाने हा दुर्गंध जाईल असे लोकांना वाटले. पण अखेर हा दुर्गंध वाढत गेला. अखेर लोकांनी पोलिसांना फोन करण्याचे ठरवले. त्यांनी पोलिसांना फोनकरुन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तपासासाठी आले असता, महिलेच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे आढळले. महिलेचे घर मोठे होते, त्यामुळे पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडला, तेव्हा त्याला समोर तिचा पाळीव कुत्रा दिसला. Video : ‘यमराज सुट्टीवर होता वाटतं?’’, झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल थोडं पुढे गेलं असता, पोलिसांना महिलाचा मृतदेह आढळला, जो आर्धा खाल्लेला होता. त्यानंतर पोलिसांना तपासात आढळले की या कुत्र्यासोबत आणखी चार कुत्रे कुठुणतरी आले होते, या सगळ्यांनी मिळून या महिलेला आपले भक्ष बनवले होते. पोलिसांनी या कुत्र्याला पकडले आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात असून शेजाऱ्यांनाही याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात