मराठी बातम्या /बातम्या /देश /

संकट दारावर! 'ते' 25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर, जारी केला अलर्ट

संकट दारावर! 'ते' 25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर, जारी केला अलर्ट

अफगाणिस्तानात ( Afghanistan) तालिबानी (Taliban Government) सरकार आल्यानंतर संपूर्ण जगभरातील समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: अफगाणिस्तानात ( Afghanistan) तालिबानी (Taliban Government) सरकार आल्यानंतर संपूर्ण जगभरातील समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, गुप्तचर अधिकाऱ्यांना याबाबतची दाट शक्यता आहे की, इस्लामिक स्टेटशी (Islamic State) निष्ठा आणि समर्थक असा 25 भारतीयांचा एक गट अफगाणिस्तानातून भारतात येत आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबाननं विविध तुरुंग तोडून टाकले. यानंतर असे म्हटले जात आहे की हे भारतीय देशात येतील. त्यामुळे आता भारतासाठी मोठा धोका मानलं जात आहे. हे सर्व 25 भारतीय राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) दहशतवादी गट IS शी संबंध असल्याच्या यादीत आहेत. NIAच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना या भारतीयांच्या सद्यस्थितीबाबत काही माहिती नाही. परंतु तपासात असे दिसून आले आहे की हे सर्व अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आयएसमध्ये सामील झाले होते. ''तरुण आत्महत्या करतोय'', Facebookच्या  आयर्लंड ऑफिसमधून थेट दिल्लीत फोन गुप्तचरांनी दिलेली माहिती लक्षात घेता, सर्व भारतीय विमानतळ आणि बंदरांना सतर्क करण्यात आले आहे. जेणेकरून हे IS समर्थक अफगाणिस्तानातून भारतात प्रवेश करू शकणार नाहीत. या 25 लोकांपैकी बहुतेक लोक केरळमधील आयएस-प्रेरित मॉड्यूलशी जोडलेले आहेत. ISमध्ये सामील होण्यासाठी ते 2016 ते 2018 दरम्यान अफगाणिस्तानातून भारतात आल्याचं मानलं जातं. एनआयएला दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आयएस-प्रेरित मॉड्यूलच्या तपासादरम्यान याची माहिती मिळाली. कोरोनाचा पुन्हा उद्रेक! पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक NIAच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यातील काही लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मात्र परदेशी संस्थांनी याला दुजोरा दिलेला नाही.
First published:

Tags: Afghanistan, Terror attack

पुढील बातम्या