मराठी बातम्या /बातम्या /Viral /विमानातून प्रवास करताना फोन फ्लाइट मोडमध्ये का ठेवावा लागतो? याचा संबंध तुमच्या आयुष्याशी

विमानातून प्रवास करताना फोन फ्लाइट मोडमध्ये का ठेवावा लागतो? याचा संबंध तुमच्या आयुष्याशी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी : आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडेच मोबाईल फोन आहेत. मोबाईल फोन वापरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. आता मोबाईल फोन लोकांसाठी खूपच कामाचा झाला आहे. माहिती मिळवण्यापासून ते पैसे देणे आणि मेल करण्यापासून ते बरीच वेगवगेळी काम लोक मोबाईलने करतात. शिवाय मोबाईल मनोरंजनाचं एक साधन आहे. त्यामुळे तो लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.

लोक अगदी सकळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोनचा वापर करतात. अगदी लोक बाथरुम आणि दिवसाच्या इतर विधी करताना देखील फोन वापरतात. पण असं असलं तरी देखील एक जागा आहे, जिथे लोकांना आपला फोन बंद ठेवावा लागतो. ते म्हणजे विमान प्रवास.

हे ही पाहा : ड्यूटीच्या वेळी झोपताना पकडला गेला, दिलेलं कारण वाचून थांबणार नाही हसू

विमानाने प्रवास करताना लोकांना मोबाईल फोन वापरू नका असा कडक सल्ला दिला जातो. विमानात चढताना फोन फ्लाइट मोडवर ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. अशा सूचना का दिल्या जातात याचा कधी विचार केला आहे का?

जर आपण हे केले नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

सर्वप्रथम, एअरप्लेन मोड म्हणजे काय ते जाणून घेऊ. खरं तर, फ्लाइट मोड हा असा पर्याय आहे, जो प्रत्येक मोबाईल फोनमध्ये असतो. हा मोड चालू करताच, सिग्नल नेटवर्क आणि इंटरनेट दोन्हीसह मोबाइल फोनचं कनेक्शन संपतं. पण तुमच्या फोनमध्ये अधीच डाऊनलोड केलेले व्हिडीओ किंवा गाणी तुम्ही ऐकू शकता. पण तुम्ही कोणालाही कॉल करु शकत नाही किंवा मॅसेज देखील करु शकत नाही. तसेच तुम्ही कोणाचाही फोन उचलू शकत नाही.

पण असं का? तर विमान उड्डाणासाठी अनेक प्रकारच्या नेव्हिगेशन सिस्टम आणि कम्युनिकेशन सिस्टमचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत विमानात बसलेले सर्व लोक आपापल्या फोनवर बोलत राहिले किंवा इंटरनेट वापरत राहिले तर विमानाच्या सिग्नल यंत्रणेत अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे रडार आणि नियंत्रण कक्षाशी वैमानिकाशी संपर्क साधण्यात अडचण येऊ शकते.

यासोबतच मार्ग चुकण्याचा किंवा अपघात होण्याचा धोकाही वाढतो. यामुळेच सर्व प्रवाशांना विमानात चढताच मोबाईल एअरप्लेन मोडमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या लहरी रडारशी टक्कर देऊ लागतात. विमानात बसलेले सर्व प्रवासी मोबाईलवर बोलू लागले तर विमानाच्या रेडिओ स्टेशनशी संपर्क तुटण्याचा धोका वाढतो. यामुळे पायलटला कंट्रोल रूममधून दिल्या जाणाऱ्या सूचना नीट ऐकू येणार नाहीत, तसेच पायलटचा संदेश खाली बरोबर ऐकू येणार नाही. त्यामुळे विमान अपघाताची शक्यता वाढते.

त्यामुळे जेव्हाही तुम्ही विमानात प्रवास करण्यासाठी जाल तेव्हा तुमचा फोन थोडा वेळ एअरप्लेन मोडवर ठेवावा, कारण हे सगळं तुमच्याच फायद्यासाठी आणि सेफ्टीसाठी केलेलं आहे.

First published:

Tags: Airplane, Social media, Top trending, Viral