लखनऊ 11 एप्रिल : माणुसकीला लाजवणारा आणि कायद्याची पायमल्ली करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वकील कारमध्ये पडलेल्या मृतदेहाच्या हाताच्या अंगठ्याचा कागदावर ठसा घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. हा एक अतिशय लाजिरवाणा व्हिडीओ आहे, जो ऑनलाइन समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही शॉक व्हाल आणि असं घृणास्पद कृत्य करणाऱ्या लोकांचा तुम्हाला रागही येईल. ट्विटरवर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. व्हिडिओमध्ये कारमध्ये मागच्या सीटवर एक मृतदेह पडलेला दिसत आहे, जो एका वृद्ध महिलेचा आहे. एक तथाकथित वकील कारच्या दरवाजाजवळ उभा असल्याचं दिसत आहे आणि त्याच्या मागे दोन लोक उभे असल्याचंही दिसत आहे. बहुधा ते मृताच्या कुटुंबातील सदस्य आहेत. हा वकील कागदांवर या मृतदेहाच्या अंगठ्याचे ठसे घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
नीचता की पराकाष्ठा देखिये
— Roli Tiwari Mishra सनातनी डॉ रोली तिवारी मिश्रा (@RoliTiwariMish1) April 10, 2023
वीडियो आगरा के सेवला जाट का बताया जा रहा है
जिसमें एक मृतक वृद्धा से उनकी सम्पतियाँ लेने के लिए उनके शव से अंगूठा लगवाया जा रहा है
इन अमानवीय लोगों का सामाजिक बहिष्कार होना चाहिए@myogiadityanathजी@Uppolice @dgpup@agrapolice @adgzoneagra संज्ञान लीजिये pic.twitter.com/r87ZXWSAwC
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर यूजर्सचा राग गगनाला भिडला असून त्यांनी यूपी पोलिसांना टॅग करून या संपूर्ण घटनेवर जाब विचारला आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत उत्तर प्रदेश पोलीस आणि आग्रा पोलिसांकडून या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. संतापजनक! दोन भावांनीच केली भावाची हत्या, कारण ऐकून पोलीसही हादरले हा लाजिरवाणा व्हायरल व्हिडिओ आग्राच्या सेवला जाटचा आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कसं वकील एका मृत वृद्ध महिलेची संपत्ती घेण्यासाठी तिच्या मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसा घेत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी या निर्दयी लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे अनेक युजर्सनी या तथाकथित वकिलाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.