जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीला अपघात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीला अपघात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीला अपघात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अपघाताचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत गुरुवारी मुंबईत एक छोटासा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्याला मार लागलेला नाही, तर गाडीचेही फारसे नुकसान झालेले नाही. मात्र पॅपराजींना त्याचे आणखी काही फोटो काढण्याची व व्हिडीओ शूट करण्याची संधी नक्की मिळाली. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अपघातानंतर रणवीर आपल्या गाडीची अवस्था पाहण्यासाठी गाडीबाहेर आला. रणवीर सिंह डबिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला. मागून येणाऱ्या दुचाकीने रणवीर सिंह याच्या मर्सडीज SUV ला धडक दिली. त्यानंतर गाडीची अवस्था पाहण्यासाठी रणवीर गाडीखाली उतरला. त्याने गाडी किती डॅमेज झाली असल्याचे पाहिले. यात त्याला जास्त नुकसान झालेले नसल्याचे दिसल्यावर तो पुन्हा गाडीत जाऊन बसला. हा प्रसंग या व्हिडीओमध्ये दाखविण्यात आला आहे. डबिंगचं काम संपवल्यानंतर घरी जाणारे रणवीर स्पोर्टी लूकमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी ब्लॅक शॉर्ट्स आणि ब्लॅक टीशर्ट घातला होता. डोक्यावर रणवीरने ब्लॅक कॅप घातली होती आणि गुलाबी रंगाचे स्पोर्ट्स शूज घातले होते. फोटोग्राफरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रणवीरच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

जाहिरात

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास रणवीर सिंह लवकरच फिल्म 83 मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचे ट्रेलर लाँच होणार असतानाच देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. हा चित्रपट नाताळपर्यंत रिलिज होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात