जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वाद घातला म्हणून महिलेनं आधी वॉचमनच्या कानशिलात लगावली मग चप्पलेनं मारलं; CCTV VIDEO व्हायरल

वाद घातला म्हणून महिलेनं आधी वॉचमनच्या कानशिलात लगावली मग चप्पलेनं मारलं; CCTV VIDEO व्हायरल

वाद घातला म्हणून महिलेनं आधी वॉचमनच्या कानशिलात लगावली मग चप्पलेनं मारलं; CCTV VIDEO व्हायरल

वॉचमनच्या कानशिलात लगावल्यानंतर महिलेनं चप्पलेनं मारहाण केली. हा सगळ्या प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 26 ऑगस्ट : तेलंगणामध्ये धक्कादायक प्रकार घडला. तेलंगणातील हैदराबादमध्ये एक महिलेनं अपार्टमेंटच्या वॉटमनशी वाद घातल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात सुरुवात केली. बिल्डिंगमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा लज्जास्पद प्रकार कैद झाला. सोमवारी जेव्हा ही महिला आपली गाडी घेऊन इमारतीच्या आत येत होती, तेव्हा वॉचमननं तिला थांबवलं. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर महिला गाडीतून खाली उतरली, आणि तिने वॉचमनला मारण्यास सुरुवात केली. वॉचमनच्या कानशिलात लगावल्यानंतर महिलेनं चप्पलेनं मारहाण केली. हा सगळ्या प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. वाचा- …आणि बघता बघता 1 किमी लांब वाहून गेला तरूण! पाहा थरारक LIVE VIDEO

जाहिरात

वाचा- भयंकर! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, अंत्यसंस्कार करण्याआधीच तरुणीनं उघडले डोळे दरम्यान, स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वॉचमननं पोलिसांत तक्रार केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेविरुद्ध लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात