...आणि बघता बघता 1 किमी लांब वाहून गेला तरूण! पाहा थरारक LIVE VIDEO

...आणि बघता बघता 1 किमी लांब वाहून गेला तरूण! पाहा थरारक LIVE VIDEO

स्टंटबाजी पडली महागात, पाण्याबरोबर 1 किमी लांब वाहून जात असतानाचा तरूणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:

प्रतापगड (उत्तर प्रदेश), 26 ऑगस्ट : उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी, नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मात्र अशा परिस्थित काही तरूण जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. अशाच एका तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील पानमोडी गावात एक 25 वर्षीय तरूण वाहत्या पाण्यात स्टंट करायला गेला. हा युवक दोरीनं नदी पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे दोरीही पाण्याबरोबर वाहत होती, तरीही हा तरुण स्टंटबाजी करत नदी पार करत होता. व्हिडीओमध्ये त्याचे मित्र त्याला आवाज देताना दिसत आहेत.

वाचा-मुसळधार पावसामुळे एका क्षणांत डोंगर कोसळला, पाहा LIVE VIDEO

वाचा-भरधाव येणारा ट्रक पाण्यासोबत गेला वाहून, पाहा LIVE VIDEO

तरुणानं जवळजवळ नदी पार केली. मात्र किनाऱ्याजवळ पोहचताच त्याचा हात सुटला आणि पाण्याबरोबर वाहून गेला. या तरुणाला वाहताना पाहून त्याच्या मित्रांनी वाचवण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या, मात्र हा तरुण पाण्याच्या प्रवाहाबरोबर तब्बल 1 किमी लांब वाहून गेला.

वाचा-एका सेकंदानं हुकला मृत्यू! स्पीडमध्ये अगदी जवळून गेली महिंद्रा व्हॅन अन् तो...

वाहून जात असताना, अचानक त्याच्या हातात एका झाडाची फांदी आली, ती पकडून तो वर आला, त्यामुळे थोडक्यात या तरुणाचा जीव वाचला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी तरुणांना नदीवर जाण्यास बंदी घातली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 26, 2020, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading